आता नगरसेवकच निवडणार नगराध्यक्ष.....थेट नागरिकांच्यातून नगराध्यक्ष निवड होणार नाही


आता नगरसेवकच निवडणार नगराध्यक्ष.....थेट नागरिकांच्यातून नगराध्यक्ष निवड होणार नाही


कराड - नगरपरिषद व नगरपंचायतीच्या नगराध्यक्षांची निवड निवडून आलेल्या नगरसेवकांनीच करावी असा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे. यामुळे ज्या नगरपरिषद, नगरपंचायतीची मुदत संपली आहे. आणि ज्या ठिकाणी निवडणूक होईल त्या ठिकाणी आता थेट नगराध्यक्ष निवडणूक होणार नाही. या निर्णयाचे स्वागत महाराष्ट्रातील नगरसेवकांनी केले आहे.नवनिर्वाचित नगरसेवक यांनी नगराध्यक्षांची निवड करण्याचा घेतलेला निर्णय हा अत्यंत महत्त्वाचा आहे. निवडून येणाऱ्या नगरसेवकांचा सन्मान करण्यासारखा आहे अशा प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.


थेट जनतेतून नगराध्यक्ष निवडणूक होत असल्याने बहुतांश नगरपालिकांमध्ये नगराध्यक्ष एका गटाचा, आघाडीचा किंवा पक्षाचा तर सत्ता दुसऱ्या गटाची, आघाडीची, पक्षाचा असा खेळ होत असल्याने अनेकदा विकास कामे होत नाहीत. हा नगरपालिकांचा अनुभव आहे. महाविकास आघाडीने घेतलेल्या निर्णयाचे स्वागत सर्वत्र होत आहे.नगरपालिका, नगरपंचायत कार्यक्षेत्रामध्ये विकास करताना नगराध्यक्ष व सत्ताधारी गट भिन्न असल्यामुळे विकासाला खीळ बसत होती. अनेक शहरांचा यामुळे विकास ठप्प झाला आहे. बहुसंख्येने ज्या गटाचे नगरसेवक निवडून येतील, त्याच गटाचा नगराध्यक्ष होणे आवश्यक आहे. मात्र थेट नगराध्यक्ष निवडणुकीमुळे हे होत नव्हते.


नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या नगराध्यक्षांची निवड ही निर्वाचित नगरसेवकांमधून करण्यात येणार आहे. यासाठी महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम 1965 मध्ये सुधारणा करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. सध्या नगराध्यक्षांची निवड थेट जनतेमधून करण्यात येते. आता थेट जनतेतून नगराध्यक्षांची निवड होणार नाही. दरम्यान अधिनियमात प्रस्तावित सुधारणा करण्यासाठी अध्यादेश प्रख्यापित करण्याची राज्यपालांना विनंती करण्यास आणि विधि व न्याय विभागाच्या सल्ल्याने अध्यादेशाचा मसूदा अंतिम करण्यास मान्यता देण्यात आली. मंत्रीमंडळाने संमती दिली असून याबाबतचा अध्यादेशाचा मसुदा तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. अंतिम मसुदा तयार झाल्यानंतर त्याला संमती देऊन अध्यादेश पारित होईल. यामुळे थेट नागरिकांच्यातून नगराध्यक्ष निवडला जाणार नाही. तर नवनिर्वाचित नगरसेवकच नगराध्यक्षांची निवड करतील.


 


Popular posts
"काँग्रेस"ला गतवैभव प्राप्तसाठी पृथ्वीराजबाबा - विलासकाका यांच्यात सकारात्मक चर्चा : राज्यमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील
Image
सातारा जिल्ह्यातील नागरिकांचा लॉकडॉऊनला चांगला प्रतिसाद : पालकमंत्री बाळासाहेब पाटील 
Image
जिल्हा परिषद पाझर तलावांची ठेका रक्कम कमी करावी..... सातारा जिल्हा मत्स्यव्यवसाय संघाचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांना निवेदन  
Image
पुणे जिल्ह्यातील "लॉकडाऊन" यंत्रणांच्या समन्वयाचा उत्कृष्ट नमुना
नगरपालिकेच्या सभेत नगरसेवकांनी प्रशासन व मुख्याधिकार्‍यांना धरले धारेवर...विषयपत्रिकेवरील 90 विषय मंजूर; सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांचा नागरी सत्कार होणार
Image