पत्रकारांच्या अस्तित्वाच्या प्रश्नावर लढाई लढावी लागणार......एस. एम. देशमुख : कराडच्या पत्रकारांच्यावतीने सत्कार समारंभ.....महिनाभरात जिल्हा कार्यकारणीचा निकाल

कराड - पत्रकार हल्ला विरोधी कायदा करून पत्रकारांचे संरक्षण करण्यात आले आहे, मात्र येत्या काही दिवसांत पत्रकारांच्या अस्तित्वाच्या प्रश्नावर लढाई लढावी लागणार आहे. कारण वृत्तपत्र, वृत्तवाहिन्या आणि सोशल मिडिया यांच्यामध्ये आमुलाग्र बदल होत असून ते प्रत्येक पत्रकारांने आत्मसात करून आपले अस्तित्व जपण्याची गरज असल्याचा सल्ला मराठी पत्रकार परिषदेचे विश्वस्त एस. एम. देशमुख यांनी दिला.


कराड येथील शासकीय विश्रामगृहात पत्रकार संरक्षण कायदा लागू करण्याच्या लढाईला यश मिळाल्याबद्दल कराडच्या पत्रकारांच्यावतीने श्री. देशमुख यांच्या सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्रा. अशोक चव्हाण होते. यावेळी शशिकांत पाटील, गोरख तावरे, प्रा. प्रमोद सुकरे, सतिश मोरे, दिलीप भोपते, खंडू इंगळे, विकास भोसले, अमोल चव्हाण, सुभाष देशमुखे, पराग शेणोलकर, नितिन ढापरे, मुख्याध्यापक दिपक पवार, विशाल पाटील, सकलेन मुलाणी, प्रकाश पिसाळ, शरद गाडे, तन्मय पाटील, रूपाली जाधव, प्रियांका पाटील आदी उपस्थित होते.


एस. एम. देशमुख म्हणाले, वृत्तपत्रांचा खप दिवसेन दिवस कमी होत आहे, ही बाब चिंतेची आहे. तसेच सोशल मिडियातील बदलामुळे वृत्तपत्रांत काम करणाऱ्यांची संख्या कमी होत आहे. वृत्तपत्रांच्या जागी आता इलेक्ट्रॉनिक्स मिडिया बरोबर वेब, युट्यूब यासारख्या सोशल मिडिया स्थान घेत आहे. पत्रकार संरक्षण कायद्यामुळे कोणत्याही प्रिंटमधील दैनिकांसह, साप्ताहिके, मासिके व इलेक्टॉनिक्स मिडियात काम करण्याऱ्या प्रत्येक व्यक्तिला संरक्षण मिळणार आहे, काही निकष आहेत ते सर्वांनी समजून घ्यावेत. या लढ्याला फार मोठा संघर्ष करावा लागला, मात्र आता केवळ संरक्षण गरजेचे नसून आता पत्रकारांना अस्तित्वाची लढाई लढावी लागणार आहे. कारण आपल्या बरोबर आपले कुटुंब असते, परंतु त्या पत्रकारांच्या पाठिमागे त्या कुटुंबाची व्यवस्था होणे गरजेचे आहे. त्यासाठी आपण लढा देणे गरजेचे आहे, मात्र त्यासोबत प्रत्येक तालुका, जिल्हा पत्रकार संघानी एक स्वतंत्र व्यवस्था करावी. जेणेकरून आपल्या जिल्ह्यातील पत्रकारांच्या वाईट काळात, पत्रकार व त्यांच्या कुटुंबाला सावरता येईल. 


शशिकांत पाटील म्हणाले, पत्रकारांच्या संरक्षणासाठी आणि हक्कासाठी श्री. देशमुख सरांनी अत्यंत प्रामाणिकपणे काम केले आहे. पत्रकारांच्या समस्या सोडविण्यासाठी त्यांनी आपली नोकरीचा राजीनामा देवून काम केले. पत्रकार संरक्षण कायद्याचा लढा हा कराडमधून सुरू झाला होता. यापुढील पत्रकारांच्या आवश्यक असलेल्या कोणत्याही लढाईला कराडचे पत्रकार नेहमीच अग्रस्थानी राहतील, अशी ग्वाही दिली. 


यावेळी पराग शेणोलकर, दिलीप भोपते, खंडू इंगळे, विकास भोसले, सतिश मोरे, प्रा.अशोक चव्हाण यांनी मनोगत व्यक्त केले. सुत्रसंचालन प्रा. प्रमोद सुकरे यांनी केले. आभार गोरख तावरे यांनी मानले. 


महिनाभरात जिल्हा कार्यकारणीचा निकाल


सातारा जिल्ह्यात गेल्या सहा वर्षात कोणत्याही प्रकारची निवडणूक झाली नाही. संघटनेची बैठक किंवा सभासद नोंदणी झाली नसून सहा वर्षच आहे तेच पदाधिकारी त्या जागेवर असल्याचे यावेळी उपस्थित पत्रकारांनी सांगितले. त्यावर संघटनेत कोणत्याही पदाधिकाऱ्यांना दोन वर्षापेक्षा जास्त काळ पदावर राहण्याचा अधिकार नाही. तसेच एकादा पद मिळालेल्या व्यक्तीला पुन्हा पद मिळू शकत नाही. त्यामुळे यापूर्वीच जिल्हा संघनेने निवडी बदलणे गरजेचे होते. यापुढील सातारा जिल्हा कार्यकारणीचा निकाल येत्या महिनाभरात लावला जाईल असे संघटनेचे विश्वस्त एस. एम. देशमुख यांनी सांगितले.


 


Popular posts
अशासकीय पदावरील नियुक्त्या रद्द ......महाराष्ट्र राज्य सहकारी परिषद, राज्यस्तरीय लेखा समिती, राज्य कृषि मूल्य आयोग
Image
कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी कोणाला नको आहेत ! मुख्याधिकारी यशवंत डांगे यांना हटविण्याचा प्रयत्न सुरू
Image
कृष्णा हॉस्पिटल, डॉ. सुरेश भोसले, अतुल भोसले यांची बदनामी करणारे यांच्या विरोधात गुन्हा दाखल....भामट्याचे नाव उघड करा पत्रकारांची मागणी 
Image
हणबरवाडी - धनगरवाडी योजनेचा पहिला टप्पा मार्च - २०२१ पर्यंत कार्यान्वित होणार...किवळ व खोडजाईवाडीचा प्रस्ताव द्यावा
Image
स्वखर्चानी शिवभक्तांनी केला शंभू महादेव मंदिराचा जीर्णोद्धार
Image