राज्यातील जनतेला न्याय मिळवून दयावा - खा. शरद पवार  शंभूराज देसाई यांना शरद पवारचे आर्शिवाद

कराड  - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार यांची गृह (ग्रामीण),वित्त,नियोजन,राज्य उत्पादन शुल्क,कौशल्य विकास व उद्योजकता,पणन राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी राज्यमंत्री म्हणून विराजमान झालेनंतर मुंबई येथे यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये सदिच्छा भेट घेतली.


यावेळी शंभूराज देसाईंनी खा. शरद पवार यांना पुष्पगुच्छ देत आर्शिवाद घेतले. शरद पवार यांनी आर्शिवाद देत पुढील राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या.तसेच राज्यमंत्री  म्हणून उत्कृष्ट काम करावे माझ्या तुम्हाला कायम सदिच्छा असल्याचेही सांगितले.


यावेळी शरद पवार यांनी राज्यमंत्री म्हणून राज्यामध्ये चांगले काम करण्याची संधी तुम्हाला मिळाली आहे.मिळालेल्या संधीचे सोने करुन राज्यातील जनतेला या खात्यांच्या माध्यमातून न्याय मिळवून दयावा. तुम्हाला प्रशासकीय कामांचा चांगला अनुभव आहेच याच अनुभवाचा लाभ राज्यातील जनतेला व्हावा मिळालेल्या खात्यांच्या माध्यमातून बरेच काही नवीन शिकण्यासारखे आहे. माझे आपणांस सहकार्य आहेच त्याचबरोबर चांगले काम करणेकरीता सदिच्छाही दिल्या.


Popular posts
"काँग्रेस"ला गतवैभव प्राप्तसाठी पृथ्वीराजबाबा - विलासकाका यांच्यात सकारात्मक चर्चा : राज्यमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील
Image
सातारा जिल्ह्यातील नागरिकांचा लॉकडॉऊनला चांगला प्रतिसाद : पालकमंत्री बाळासाहेब पाटील 
Image
जिल्हा परिषद पाझर तलावांची ठेका रक्कम कमी करावी..... सातारा जिल्हा मत्स्यव्यवसाय संघाचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांना निवेदन  
Image
पुणे जिल्ह्यातील "लॉकडाऊन" यंत्रणांच्या समन्वयाचा उत्कृष्ट नमुना
नगरपालिकेच्या सभेत नगरसेवकांनी प्रशासन व मुख्याधिकार्‍यांना धरले धारेवर...विषयपत्रिकेवरील 90 विषय मंजूर; सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांचा नागरी सत्कार होणार
Image