मनसे विद्यार्थी सेनेच्यावतीने गोरगरीब विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप


मनसे विद्यार्थी सेनेच्यावतीने गोरगरीब विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप


कराड - महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना कराड शहर आणि संजय वायदंडे प्रतिष्ठान यांच्यावतीने प्रतिवर्षाप्रमाणे 26 जानेवारी या प्रजासत्ताक दिनी समाजातील गोरगरीब विद्यार्थ्यांना शालेय शिक्षण उपयोगी साहित्याचे वाटप करण्यात आले. नगरपालिका शाळा क्रमांक 10 येथील अंगणवाडीमध्ये कार्यक्रम संपन्न झाला.


महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्यावतीने कराड शहर व परिसरातील विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी साहित्याचे नियमित वाटप करण्यात येत आहे. समाजातील गोरगरीब विद्यार्थ्यांचे शिक्षण पूर्ण झाले पाहिजे, यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना सातत्याने प्रयत्न करीत असल्याचे विद्यार्थी सेनेचे शहराध्यक्ष विनायक भोसले यांनी सांगितले.संघटनेच्यावतीने विविध उपक्रम राबवत असताना समाजातील दुर्लक्षित घटकांना न्याय देण्याची भूमिका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची राहिली आहे. त्याचबरोबर उपेक्षित समाजातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य अत्यावशक असल्यामुळे ते पुरवण्याचा उपक्रमही नेहमी राबवला जात असल्याचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष सागर बर्गे यांनी सांगितले.


गोरगरीब गरजू विद्यार्थ्यांना शालेय बॅग, वही, कंपास पेटी व खाऊ वाटप करण्यात आले. संजय वायदंडे प्रतिष्ठानचे अध्यक्ष रमेश वायदंडे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष सागर बर्गे, शुभम घोडके, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे शहराध्यक्ष विनायक भोसले, राज दाभाडे, ओमकार भोसले, शरद भोसले बुधवार व परिसरातील नागरिक उपस्थित होते. राज मेडिकलचे सलीम मुजावर यांनी सदर उपक्रमासाठी बहुमूल्य मार्गदर्शन व सहकार्य, मदत केली आहे.