दोन उंच पुलाच्या कामासाठी १ कोटी ६० लाख मंजूर......सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांचा विकासकामांचा धूमधडाका
कराड - मोहीतेवाडी (ता.कोरेगांव), पार्ले - बनवडी (ता.कराड) येथील नवीन उंच पुलाच्या कामास मंजूरी देण्यात आली आहे. या कामाकरिता सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील यांनी सार्वजनिक बांधकाम खात्याला सदरच्या प्रश्नांची माहिती देऊन निधी मंजूर झाला असल्याची माहिती संबंधित खात्याला दिली आहे.
खंडाळा,कोरेगांव, मसूर, कराड, सांगली ,शिरोळ रस्ता मोहीतेवाडी गावानजीक सध्या कमी उंचीचा पूल आहे.सदर ठिकाणी तारगाव, मोहीतेवाडी, वाठार ,आर्वी, नागझरी, पुसेसावळी या रस्त्याचा व वरील राज्यमार्गाचा छेद होतो. या ठिकाणी दोन्ही रस्त्याचे जंक्शन काटकोनात आहे. त्यामूळे सातत्याने याठिकाणी छोटे - मोठे अपघात होत आहेत. त्यासाठी सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी अधिक्षक अभियंता सा.बांधकाम मंडळ (सातारा) यांना पत्राद्वारे सूचीत करूण सदर अपघातग्रस्त ठिकाण ८० लाख निधी मंजूर झाला असून, लवकरच या उंच पूलाचे काम सुरू होणार आहे. त्यामूळे याठिकाणी सुस्थीती निर्माण होवून दळणवळण सुलभ होणार आहे.
तसेच वडोली, पार्ले - बनवडी, सैदापूर रस्ता येथील पार्ले गावानजीक ब्रिटीश कालीन जूना पूल आहे. त्याठिकाणी नविन उंच पूल बांधण्याची सातत्याने मागणी पार्ले ग्रामस्थांनी मंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे केली होती. परंतू सदरचा रस्ता पूर्वी जिल्हा मार्ग असा दर्जाचा होता, त्यामूळे त्यावरती निधी मंजूर होण्यास अडचणी निर्माण होत होत्या. यासाठी सदर रस्त्याची दर्जोनत्ती करूण राज्यशासनाकडे नाबार्डमधून प्राधान्याने मागणी केली होती. सदर सदर कामासाठी ८0 लाख निधी मंजूर झाला आहे.