माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे दिलीप पांढरपट्टे महासंचालक...... प्रसारमाध्यम संपादक पत्रकार परिषदेच्यावतीने गोरख तावरे यांनी केले अभिनंदन


माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे दिलीप पांढरपट्टे महासंचालक...... प्रसारमाध्यम संपादक पत्रकार परिषदेच्यावतीने गोरख तावरे यांनी केले अभिनंदन


मुंबई (राजसत्य) - माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाचे महासंचालक म्हणून सिधुदुर्गचे जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. माहिती आणि जनसंपर्क विभागाचे महासंचालक दिलीप पांढरपट्टे यांची नियुक्ती झाल्याचे राज्य शासनाच्यावतीने जाहीर करण्यात आले आहे. यापूर्वी माहिती आणि जनसंपर्क विभागाच्या महासंचालकपदी ब्रिजेशसिंग हे कारभार पाहत होते.ब्रिजेशसिंग हे आयपीएस अधिकारी होते. तर दिलीप पांढरपट्टे हे आयएएस दर्जाचे अधिकारी आहेत.


शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस यांचे महाआघाडीचे सरकार असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पदभार स्वीकारल्यापासून महाराष्ट्रातील लघु-मध्यम वृत्तपत्रांना न्याय मिळेल अशी भावना निर्माण झालेली आहे.उद्धव ठाकरे हे दैनिक सामनाचे संपादक म्हणून कार्यरत होते. वृत्तपत्र व पत्रकारांच्या सुख-दुःखाची त्यांना जाण व जाणीव आहे. महाराष्ट्रातील लघु व मध्यम वृत्तपत्र चालविताना बरीच कसरत करावी लागते. यासाठी लघु व मध्यम वृत्तपत्रांना शासनाचे सहकार्य व मदतीची नेहमी अपेक्षा राहिली आहे.आतापर्यंत राज्य शासन नेहमीच लघु व मध्यम वृत्तपत्रांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलेले आहे. दरम्यान "शासकीय संदेश प्रसारण नियमावली"मध्ये लघु व मध्यम वृत्तपत्रांना जाचक अटी लादल्यामुळे महाराष्ट्रातील अनेक वृत्तपत्रे बंद होतील अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. नवनियुक्त महासंचालक दिलीप पांढरपट्टे हे वृत्तपत्रांचे प्रश्न समजावून घेतील आणि मार्ग काढतील.अशी अपेक्षा प्रसारमाध्यम संपादक पत्रकार परिषदेचे अध्यक्ष गोरख तावरे यांनी व्यक्त केले आहे.


दरम्यान महाराष्ट्रामध्ये बहुसंख्य ग्रामीण भागातून प्रसिद्ध होणारे लघू व मध्यम वृत्तपत्र आहेत. लघू व मध्यम वृत्तपत्रांचे अनेक प्रश्‍न शासन दरबारी असल्यामुळे नवनियुक्त महासंचालक दिलीप पांढरपट्टे हे ग्रामीण भागातील लघू व मध्यम वृत्तपत्रांना न्याय देतील अशी भावना लघू व मध्यम वृत्तपत्र संपादकांमध्ये झाली आहे. गतकाळातील सरकारने शासकीय संदेश प्रचार नियमावली 2018 दि. 20 डिसेंबर 2018 रोजी प्रसिद्ध केली आहे. या नियमावलीमध्ये लघु व मध्यम वृत्तपत्रांसाठी जाचक अटी आहेत. त्या स्थितीतील करून शुद्धिपत्रक प्रसिद्ध करावे यासाठी महाराष्ट्रातील वृत्तपत्रासाठी काम करणाऱ्या अनेक संघटना प्रयत्न करीत आहेत. या प्रयत्नांना आता सकारात्मक प्रतिसाद मिळेल अशी प्रतिक्रिया संपादकांच्या संघटनांनी व्यक्त केली आहे.


दिलीप पाढरपट्टे हे अगोदर धुळे आणि सध्या सिंधुदुर्गमध्ये जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत आहेत.चांगले लेखक,साहित्यिक असलेले दिलीप पांढरपट्टे गझलकार म्हणून प्रसिध्द आहेत.त्यांच्या गझलेची काही पुस्तकं प्रसिध्द आहेत. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय हे शासनाने घेतलेल्या निर्णयाची अधिकाधिक प्रचार व प्रसिद्धी करण्याचे काम करीत आहे.प्रचार व प्रसिद्धीसाठी वृत्तपत्रांची महत्त्वाची भूमिका असून ग्रामीण भागात राज्य शासनाचे निर्णय पोचविण्यासाठी लघु-मध्यम वृत्तपत्रांची महत्त्वपूर्ण भूमिका आहे.माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे महासंचालक म्हणून दिलीप पांढरपट्टे यांची नियुक्ती झाल्याबद्दल प्रसारमाध्यम संपादक पत्रकार परिषदेच्यावतीने गोरख तावरे यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.