राज्य उत्पादन शुल्क राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला विभागाचा आढावा


मुंबई -  राज्यउत्पादन शुल्क विभागाचे राज्यमंत्री  शंभूराज देसाई यांनी आज विधानभवन येथे विभागाची आढावा बैठक घेतली.यावेळी राज्य उत्पादन शुल्क विभागाची कार्यव्यूहरचना जाणून घेतली. यामध्ये मद्यावरील उत्पादन शुल्कअनुज्ञप्ती शुल्कदंड व विशेषाधिकार आयुक्त कार्यालय संरचनाक्षेत्रीय संरचनाप्रशासकीय विभागदारूबंदी कायद्याची नियमावलीमद्य घाऊक विक्रीकिरकोळ विक्रीमद्यनिर्मितीउत्पादन शुल्क आकारण्याची  पध्दतसध्या अस्तित्वात असलेले दर व एमआरपीचे कोष्टकयाबाबत श्री. देसाई यांनी विभागाच्या कार्यपद्धतीचा आढावा घेतला.


राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या विविध कार्यप्रणालीमध्ये अत्याधुनिक साधनसामुग्रीचा वापर करण्याबाबतही त्यांनी यावेळी सूचना केली. तसेच गुन्हेगारांना वचक बसावा या पद्धतीने कार्यप्रणाली आखण्यात यावी. अवैधरित्या मद्य विक्रीला आळा घालण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात अशा सूचना राज्य उत्पादन शुल्क विभागाचे राज्यमंत्री श्री. देसाई यांनी आज संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. विभागातील रिक्त पदांबाबतही त्यांनी माहिती घेतली.


यावेळी  राज्य उत्पादन शुल्क विभागाचे प्रधान सचिव  वल्सा नायर-सिंहआयुक्त श्रीमती प्राजक्ता लवंगारे वर्मा तसेच संबंधित विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.


Popular posts
जिल्हा परिषद पाझर तलावांची ठेका रक्कम कमी करावी..... सातारा जिल्हा मत्स्यव्यवसाय संघाचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांना निवेदन  
Image
सातारा जिल्ह्यातील नागरिकांचा लॉकडॉऊनला चांगला प्रतिसाद : पालकमंत्री बाळासाहेब पाटील 
Image
"काँग्रेस"ला गतवैभव प्राप्तसाठी पृथ्वीराजबाबा - विलासकाका यांच्यात सकारात्मक चर्चा : राज्यमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील
Image
नगरपालिकेच्या सभेत नगरसेवकांनी प्रशासन व मुख्याधिकार्‍यांना धरले धारेवर...विषयपत्रिकेवरील 90 विषय मंजूर; सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांचा नागरी सत्कार होणार
Image
ग्रामपंचायतीच्या मासिक सभांना अटींचे पालन केल्यास कलम 144 मधून सूट : जिल्हाधिकारी शेखर सिंह
Image