राज्यातील शेतकऱ्यांना न्याय देण्याला प्राथमिकता असेल.....सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी पदभार स्वीकारला

कराड - महाराष्ट्र राज्याचे सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील यांनी मंत्रालयातील दालन क्रमांक 241 विस्तारित इमारत(मुंबई) येथे आज आपल्या मंत्रीपदाचा पदभार स्वीकारला. कराड उत्तर विधानसभा मतदार संघातून आमदारकीचा रौप्यमहोत्सव साजरा करणारे बाळासाहेब पाटील यांना सहकार व पणनमंत्री म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष, खासदार शरद पवार यांनी संधी दिली आहे. 30 डिसेंबर रोजी बाळासाहेब पाटील यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली होती बुधवार 8 जानेवारी रोजी मंत्रालयात त्यांनी मंत्रीपदाचा पदभार स्वीकारला आहे.


सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी पदभार स्वीकारला यावेळी आ.भारत भालके, आ.संग्राम थोपटे, आदर्श सरपंच शहाजी क्षीरसार, सेवानिवृत उपायुक्त तानाजी साळुखे, माजी सहकार न्यायाधिश अॅड.अशोक पवार, आश्रमशाळा, संचालक किरण शिंदे उपस्थित होते.


आदरणीय शरद पवारसाहेब यांच्या विचारांची पाठराखण करीत, स्व. यशवंतराव चव्हाण व आदरणीय स्व पी.डी. पाटीलसाहेब यांच्या विचारानुसार सहकार, सामाजिक, राजकीय क्षेत्रात वाटचाल करून काम करीत आहोत. याची दखल घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारसाहेब यांनी राज्यस्तरावर काम करण्याची संधी उपलब्ध करून दिली असे सांगून सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील यांनी पदभार स्वीकारल्यानंतर म्हणाले, राज्यातील सहकार चळवळ अधिक सक्षम करण्याचा आपला प्रयत्न राहील. सहकार क्षेत्रातील तज्ञांची विविध प्रसंगी चर्चा केली जाईल. शेतकऱ्यांना न्याय देण्याची भूमिका नेहमी राहील सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या शेतकऱ्यांना न्याय देण्याची नेहमीच माझी भूमिका राहिली आहे.आता .महाराष्ट्रामध्ये सहकार व पणनमंत्री पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर राज्यातील शेतकरी बांधवांना न्याय देण्याची प्राथमिकता असेल असेही सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील यांनी सांगितले.


Popular posts
अशासकीय पदावरील नियुक्त्या रद्द ......महाराष्ट्र राज्य सहकारी परिषद, राज्यस्तरीय लेखा समिती, राज्य कृषि मूल्य आयोग
Image
पुणे जिल्ह्यातील परप्रांतीय मजुरांना वनराईतर्फे शिधावाटप
Image
डॉ. अतुल भोसले यांचा विरोधकांना सवाल...इतरांच्या नावावर बोगस कर्ज का घेतले ? त्यांना तुरूंगात का जावे लागले ? या प्रश्‍नांची उत्तरे हिंमत असेल तर द्यावीत 
Image
सातारा - पुणे महामार्गावरील खड्डे 15 मार्चपर्यंत बुजवावेत.....पालकमंत्र्यांनी घेतला जिल्ह्यातील रस्ते कामांचा आढावा
Image
  स्व. वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय नॉन कोविड जाहीर करावे,... डॉ. प्रकाश शिंदे यांच्या हलगर्जीपणामुळे कराडला गंभीर धोका निर्माण झाला... "कोरोना"च्या पार्श्वभूमीवर रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा
Image