कराड - पाटण शिक्षक संघटनेचा नावलौकिक वाढवतील -उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे....... अंकुश नागरे यांचा यथोचित सत्कार


कराड - पाटण शिक्षक संघटनेचा नावलौकिक वाढवतील -उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे....... अंकुश नागरे यांचा यथोचित सत्कार


कराड - अंकुश नांगरे यांनी गेले अनेक वर्षापासून संघटनेच्या माध्यमातून सर्वसामान्य शिक्षकांच्या अडचणी सोडविण्याच्या दृष्टीने अनेक आंदोलने केलेले आहेत.शिक्षकांचे अनेक प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्यामार्फत चांगल्या प्रकारे प्रयत्न केले. शिक्षक संघटनेच्या माध्यमातून नांगरे स्वतःच्या कर्तृत्वावर, अभ्यासाद्वारे संस्थेचा नावलौकिक वाढवतील असा विश्वास उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे यांनी व्यक्त केला.


मलकापूर नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे यांच्याहस्ते कराड-पाटण तालुका शिक्षक सहकारी सोसायटीचे नूतन चेअरमन अंकुश नांगरे यांचा सत्कार समारंभ नुकताच संपन्न झाला. सरपंच अनिल माळी, सातारा शिक्षक समितीचे उपाध्यक्ष संजय नांगरे, सरचिटणीस नारायण सातपुते, लालासाहेब देसाई, यशवंत जाधव, विश्वास पाटील, कराड तालुका शिक्षक समितीचे उपाध्यक्ष दिनकर पाटील, दिलीप राजे कुंभार,संजय शेंडे,आनंद पाटील, कर्मचारी महासंघाचे उपाध्यक्ष प्रदीप निळकंठ, मुख्याध्यापक संपतराव साकुर्डेआदींची प्रमुख उपस्थिती होती.


प्रास्ताविक मोहन सातपुते यांनी केले. शेवटी आभार माजी अध्यक्ष लालासाहेब देसाई यांनी मानले.