६० दिवसात २०० गडकिल्ले सर करणारा परदेशी अवलिया पीटर व्हॅन गेट...... आठवणींसह मरा स्वप्नां बरोबर नाही..!

                     


                     (गोरख तावरे)


सह्याद्री पर्वतामध्ये असणारे गड-किल्ले व शिवरायांच्या इतिहासाचे आकर्षण असलेला ४७ वर्षांचा अवलिया 'पीटर व्हॅन गेट' हे सातासमुद्रापार असलेल्या बेल्जियम येथील नागरिक आहे. पीटर व्हॅन गेट यांनी अवघ्या ६० दिवसात 200 गडकिल्ले सर केलेले आहेत. ६० दिवसातील अनुभव कराडकरांना भरभरून सांगत होते. युवा पिढीला प्रेरणा देणारे परदेशी नागरिक पीटर व्हॅन गेट' हे महाराष्ट्रातील गड-किल्ले, छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरवशाली इतिहासाबद्दल बोलतात. महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांचे सचित्र दर्शनाचा कराडकरांना अनुभव सांगतात हे सगळं विलक्षणच.


पीटर व्हॅन गेट' हे सध्या चर्चेचा विषय असणारा परदेशी पाहुना असून सह्याद्री डोंगररागांतून वणवण फिरून गड-किल्ल्यांची माहिती गोळा करीत आहे. परदेशात सिस्को कंपनीत मोठ्या पदावर असल्याने कंपनीने पीटर व्हॅन गेट' यांना हिंदुस्थानात नवीन इंजिनिअर भरतीसाठी पाठवले. हिंदुस्थानातील संस्कृती व गड-किल्ल्यांची त्यांना इतकी भुरळ पाडली की, त्यांनी नोकरी हिंदुस्थानातच मिळावी अशी कंपनीला विनंती केली. विशेष म्हणजे कंपनीनेही विनंती मान्य केली.पीटर व्हॅन गेट' यांना भटकंतीची अत्यंत आवड असल्यामुळे ऑफिसमधील सहकाऱ्यांनाही भटकंतीस येण्यास प्रवृत्त करीत आणि आपल्याबरोबर घेऊन जात. पीटर व्हॅन गेट हे हिंदुस्तानच्या प्रेमातच पडले आहेत.


सह्याद्रीच्या डोंगररांगा पिंजून काढतांना त्यांच्याबरोबर कोणी जोडीदार असेल तर ठीक नाहीतर "ऐकला चलो रे" प्रमाणे गडभ्रमंती करीत आहेत. सह्याद्रीच्या डोंगर रांगांमध्ये गडभ्रमंती करताना सोबतीला सुरक्षिततेसाठी काही सामान नसते. जणू भिती आणि पीटर व्हॅन गेट यांच काहीच घेण देण नाही. कमीत कमी साहित्य घेऊन ते भटकंती करताहेत. त्यांच्या बॅगेमध्ये एका व्यक्तीसाठी लागणारे एक अगदी छोटा तंबू, स्लीपिंग मॅट व एक स्लीपिंग बॅग असते.. डोक्यावर टोपी,अंगावर एक टीशर्ट, छोटी पॅन्ट,सॉक्स व शूज या साहित्याबरोबरच GPS साठी व मोजके फोटो काढण्यासाठी एक मोबाईल फोन (OnePlus7pro) इतकेच सामान असते, याव्यतिरिक्त काहीही नाही."ट्रान्स सह्याद्री" त्यांच्या मोहिमेत कमीत कमी वेळात २०० गडकिल्ले पाहण्याचा त्यांचा मानस होता.


गेल्या दोन महिन्यांपासून पीटर व्हॅन गेट सह्याद्री पर्वतरांगांमध्ये फिरण्याची मुशाफिरी करीत आहेत. महाराष्ट्रातील अनेक लहान मोठे गडकिल्ले पाहून आल्यानंतर सध्या ते सातारा जिल्ह्यातील गडकिल्ले पाहण्यासाठी कराड येथे आले असता सदाशिवगड, आगाशिवगड, वसंतगड पाहिला. सातारा , सांगली , कोल्हापूर भागामध्ये असणारे गडकिल्ले पाहण्याची मोहीम सुरू केली आहे. विशेष म्हणजे पीटर व्हॅन गेट हे एका दिवसात चार ते पाच किल्ले पाहतात, डोंगरात अथवा पायथ्याच्या गावात जागा मिळेल तेथे आपला तंबू लावतात आणि मुक्काम करतात. पीटर व्हॅन गेट यांचा गडकिल्ले चढण्याचा व उतरण्याचा वेग व क्षमता नेहमी ट्रेकर्सवर असणाऱ्या युवकांना लाजवतील असा आहे. ज्या गावात मुक्काम असेल तेथील गावकऱ्यांनी प्रेमाने दिलेला पाहुणचार स्वीकारून शांतपणे झोपतात, भटकंतीच्यावेळी अन्नताजे, पोस्टीक, अथवा आपल्या मनासारखे जेवण मिळावे याला पीटर व्हॅन गेट दुय्यम स्थान देतात. दिवसभरात एक ग्लास किंवा तांब्या पिलेल्या पाण्यावर तृप्त होऊन गड-किल्ल्यावर चित्त्याच्या वेगाने चढण्यात पीटररांची हातखंडा आहे.


सदाशिवगड सर करण्यास कराडमधील युवकांना ३० मिनिटे लागतात. दरम्यान पीटर व्हॅन गेट यांनी गडावरील पायऱ्या १० ते १५ मिनिटात पाया वेगळे करून गडावर पोहोचले. डोक्यावर ऊन असल्यामुळे दमछाक होते. सदाशिव गडावर सुमारे १००० पायऱ्या आहेत. कराडपासून सदाशिवगड जवळ असल्याने अनेकांची नेहमी इथे ये - जा सुरू असते. पीटर व्हॅन गेटनी कराडमधील नकट्या रावळ्याची विहिर पाहिली, कृष्णा -कोयना नदीच्या प्रितिसंगममध्ये येथेच्छ पोहोले, स्वर्गीय यशवंतराव चव्हाण समाधीचे दर्शन घेतले, मस्तपैकी फेटा बांधला, कराडबरोबर फोटोशूट केलेले, लस्सी घेतली आणि निनाद बेडेकरांच्या ' कालातीत व्यवस्थापण तत्वे' आणि भगवान चिले यांचे 'गडकोट' या पुस्तकांवर पीटर यांनी स्वाक्षरी केली.पीटर व्हॅन गेट पल्सरवर स्वार होऊन मच्छिंद्रगडाकडे प्रस्थान केले. इतका मोठा माणूस , कोणता गर्व नाही, नम्रपणा हा फक्त हिंदुस्थानचा इतिहास, सह्याद्री पर्वतरांगा आणि शिवाजी महाराजांबद्दल जाऊन घेण्याची उत्सुकता अशा अवलियाचे आवडते वाक्य " DIE WITH MEMORIES NOT DREAMS " आठवणींसह मरा स्वप्नां बरोबर नाही..!


उमेश शिंदे युथ फाऊंडेशनचेवतीने कराडमध्ये परदेशी पाहुण्यांच्या एक बहारदार व सुंदर कार्यक्रम झाला. यासाठी उमेश आनंदराव शिंदे, संदिप घेवरे, ऋषिकेश कुंभार, किरण मुळे, समाधान चव्हाण, अमित चोथे, विनायक घेवदे, सदाशिव साळुंखे, अभिषेक कारंडे, आशिष रैनाक, यल्लाप्पा कोळी यांनी का कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन अबोली फणसळकर, राहुल यादव यांनी केले.


वेणूताई चव्हाण स्मारक येथे झालेल्या कार्यक्रमाचे इंग्रजीतील भाषणाचे मराठी भाषांतर मोरे सर (जनकल्याण शाळा) यांनी केले. कार्यक्रमांमध्ये नगराध्यक्ष रोहीणी शिंदे, के .एन .देसाई सर, राजेंद्रसिंह यादव,उमेश शिंदे,सौरभ पाटील, भूषण जगताप यांनी प्रसंगअनुरूप भाषण केले. प्रमुख पाहुणे म्हणून मा. ना.शेखरजी चरेगांवकर, नगराध्यक्ष रोहीणी उमेश शिंदे,राजेंद्रसिंह यादव,के .एन . देसाई सर,किरण पाटील, विजय वाटेगांवकर, सौरभ पाटील, शिवप्रतिष्ठानचे सागर आमले यांची उपस्थिती होती.


"वाटा सहयाद्रीच्या" : अनिकेत साळोखे, सौरभ आदवडे, संकेत फडके, सर्वेश उमराणी, शुभम जंगम, प्रणव कुंभार, अथर्व गाडगीळ, माधव पित्रे, अमित पोतनीस, वैष्णवी सुर्वे, नितीन कुलकर्णी, आर्या फणसळकर, रोहित यादव, जयेश मोरे या कार्यकर्त्यांनी परदेशी पाहुणे पीटर व्हॅन गेट यांच्याबरोबर सदाशिव गड सर केला. Popular posts
सातारा जिल्ह्यात 21 रुग्णांची नोंद.... एकूण रुग्णांची संख्या 113
अशासकीय पदावरील नियुक्त्या रद्द ......महाराष्ट्र राज्य सहकारी परिषद, राज्यस्तरीय लेखा समिती, राज्य कृषि मूल्य आयोग
Image
कराड वार्तापत्र - गोरख तावरे जनशक्ती आघाडीमध्ये बंड झाल्याने गटात गट निर्माण जानेवारी महिन्यातल्या पहिल्या आठवड्यात होणाऱ्या विविध समितींच्या सभापती निवडीच्या अनुषंगाने कराड नगरपालिका राजकारणात हालचालीस प्रारंभ झाला आहे. दरम्यान जनशक्ती आघाडीमध्ये उभी फूट पडली आहे. उपनगराध्यक्ष जयवंत पाटील यांनी आपल्या गटाला स्वतंत्र बसण्यासाठी वेगळी जागा सभागृहात द्यावी, अशी मागणी केल्याने जनशक्ती आघाडीत फूट पडली. कराड नगरपालिकेच्या राजकारणातील गटात गट निर्माण झाल्याची चर्चा संपूर्ण शहरभर सुरू आहे. दरम्यान ऐतिहासिक कराड नगरपालिका राजकारणातील आघाड्यांना फुटीचे ग्रहण लागले आहे. यापूर्वीही अनेक वेळेला नगरपालिकेमध्ये वेगवेगळ्या विचाराच्या निवडून आलेल्या आघाड्यांमध्ये बंड झाले, फूट पडली अशीच परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. स्वर्गीय पी. डी. पाटीलसाहेब कराड नगरपालिकेचे नगराध्यक्ष असताना 25 विरुद्ध 24 अशी सदस्य संख्या होती. दरम्यान एका सदस्याने बंड पुकारून विरोधात गेल्यामुळे सत्ताधारी गट अल्पमतात आला होता. दरम्यान मुरब्बी राजकारणी असणारे पी. डी. पाटील यांनी एका दिवसात हे बंड मोडून काढले. आपला गेलेला सदस्य पुन्हा आपल्या गटात घेऊन आले. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या राजकारणामुळे कराड नगरपालिकेतील सत्ताधारी जनशक्ती आघाडीमध्ये फुट पडली असे बोलले जात आहे. नगरपालिका म्हटले की, गट-तट, आघाड्या, कुरबुडी, देणे घेणे असे सर्रास घडत असते. जनशक्ती आघाडी फुटली, नगरसेवक घेत असलेल्या वेगवेगळ्या भूमिकेमुळे फुटीचे राजकारण हा मुद्दा ऐरणीवर आला.कराड शहरासाठी विकास निधी राज्य शासनाकडून येतो. हा विकास निधी विविध कामावर खर्च करीत असताना कामाचा दर्जा बिलकुल नाही, ठेकेदार दर्जाहीन कामे करतात, हे अनेक कामे पाहिल्यानंतर स्पष्ट होत आहे. दर्जाहीन विकास कामे होत असल्याने नागरिकांची सातत्याने ओरड सुरू आहे. मात्र याकडे नगरसेवक अथवा प्रशासन गांभीर्याने पाहत नाही.यामुळे विद्यमान सत्ताधारी गटातील नगरसेवकांबद्दल नागरिकांच्या मनामध्ये तीव्र संताप निर्माण झाला आहे. मुख्य पदाधिकाऱ्यांसह सर्वच नगरसेवक कराड शहराच्या विकासाकडे लक्ष देणार का ? असा प्रश्न विचारला जात आहे. उपनगराध्यक्ष जयवंत पाटील यांनी गटात गट केलेला कायम राहणार का ? सभापतीच्या निवडीवेळी "तलवार म्यान" होणार का ? हे येणाऱ्या काही दिवसात स्पष्ट होईल. कारण जयवंत पाटील उपनगराध्यक्ष झाल्यापासून सत्ताधारी गटाचा सर्व कारभार जयवंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली चालला आहे. दरम्यान जयवंत पाटील यांनीच बंड पुकारल्यामुळे जनशक्ती आघाडीचे काय होणार ? असा सवाल उपस्थित होत आहे. जनशक्ती आघाडीतील वाद चव्हाट्यावर आला आणि उपनगराध्यक्ष जयंवत पाटील यांनी सभागृहात वेगळी बसण्याची मागणी केली. कराड नगरपालिका राजकारणाची दिशाच बदलली आहे. उपनगराध्यक्ष जयवंत पाटील व माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र यादव यांच्यामध्ये समेट घडावा यासाठी प्रयत्न केला जात आहे. विविध समितीच्या सभापतीची निवड करण्याचा अधिकार कोणाला ? आघाडीच्या अध्यक्षांना का नगरपालिकेतील गटनेत्याला ? याबाबत उलट सुलट चर्चा सुरू झाली आहे.दरम्यान विविध समितीच्या सभापती निवडीच्या अनुषंगाने आत्तापर्यंत राजेंद्र माने,महेश कांबळे, किरण पाटील यांना सभापती पदाची संधी मिळालेली नाही. यावेळेला सभापतीपदाची लॉटरी या तीन उमेद नगरसेवकांना लागेल का नाही ? हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये कराडच्या नगरसेवकांची भूमिका संभ्रमावस्थेत राहिली होती. कोणत्या उमेदवाराला पाठिंबा कुणाला द्यायचा ? प्रचार कोणाचा करायचा ? याबाबत मात्र कराड नगरपालिकेतील नगरसेवकांचे लवकर एकमत झाले नाही. कराडच्या नगरसेवकांनी आपली भूमिका लवकर स्पष्ट केली नाही. विधानसभा निवडणुकीतील नगरसेवकांच्या भूमिकेबाबत कराडमध्ये आजही चर्चा सुरू आहे.कराड नगरपालिकेला निवडून येणार्‍या नगरसेवकांची भूमिका कराड शहराच्या विकासाबाबत संवेदनशील हवी, मात्र सध्या ती दिसून येत नाही.  नगरपालिका निवडणुकीनंतर कराड नगरपालिकेमध्ये राजकीय तीन गट अस्तित्वात आले. यामध्ये लोकशाही आघाडी विरोधात बसली आहे. भाजपाचे काही नगरसेवक निवडून आले त्यांचा एक गट आहे. त्याचबरोबर सत्ताधारी म्हणून जनशक्ती आघाडी कारभार पाहत आहे. तर भाजपच्या नगराध्यक्षा स्वतंत्रपणे आपला कारभार करीत आहेत. उपनगराध्यक्ष जयवंत पाटील यांनी आपल्या पाच नगरसेवकांचा वेगळा गट निर्माण केला आहे. उपनगराध्यक्ष जयवंत पाटील यांचा गट म्हणजे गटात गट निर्माण झालेला आहे. जनशक्ती आघाडीच्या निवडून आलेल्या नगरसेवकांच्या बरोबर आता इथून पुढे आपला "घरोबा" असणार नाही असे सांगून त्यांनी कराड नगरपालिकेचा कारभार सुरू केला आहे. यशवंत विकास आघाडीचे राजेंद्रसिंह यादव यांना मांणणारे नगरसेवक आहेत. मात्र राजेंद्रसिंह यादव हे नगरपालिका राजकारणात, नगरपालिका कारभार चालवण्यासाठी जेवढा वेळ द्यायला हवा, तेवढा वेळ देत नाही, त्यामुळे नगरसेवकांनी अडचणी कोणासमोर मांडायच्या ? हा प्रश्नच आहे. अशी एकाकी पडलेले नगरसेवक आता एकत्रित सर्वांची मोट बांधण्याचा प्रयत्न करीत आहेत. याला किती प्रतिसाद मिळेल, हे आत्ताच सांगता येणार नाही. येणाऱ्या कालावधीमध्ये गटातला गट शिल्लक राहतो का ? जनशक्ती आघाडीच्या छत्रछायेखाली निवडून आलेले सर्व नगरसेवक एकत्र राहणार का ? हे काही कालावधीनंतर स्पष्ट होईल.  जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये विविध समितींच्या सभापतींची निवडणूक होणार आहे. यावेळी गटातला गट अथवा जनशक्ती आघाडीची काय रणनीती राहणार हे पहावे लागेल. कराडमधील राजकीय समीकरणांबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. दरम्यान, उपनगराध्यक्ष जयवंत पाटील यांनी आपल्यासोबत महेश कांबळे, कश्मिरा इंगवले, माया भोसले, अरुणा पाटील हे नगरेसवक असल्याचा दावा केला आहे. उपनगराध्यक्ष जयवंत पाटील हे भाजपचे डॉ. अतुल भोसले यांचे समर्थक आहेत. तर राजेंद्रसिंह यादव गट श्री. छ. उदयनराजे भोसले यांचे समर्थक आहेत. त्यामुळेच आता नगरपालिका राजकारणात काय होणार ? याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. नगरपालिका निवडणुकीत आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील यशवंत जनशक्ती लोकसेवा आघाडीचे 16 नगरसेवक विजयी झाले. तर या आघाडीला एका महिला नगरसेविकेने पाठिंबा दिला. दरम्यान निवडून आल्यानंतर प्रथम जनशक्ती आघाडीच्या नगरसेवकांनी पृथ्वीराज चव्हाण यांचा विश्वासघात केला आणि त्यांचे नेतृत्व झुगारून दिले. कराड नगरपालिकेत भाजपाचे पाच, लोकशाही आघाडीचे सहा तर बहुमतात असलेल्या जनशक्ती आघाडीसह आ. पृथ्वीराज चव्हाण यांचे नेतृत्व मानणारे कॉग्रेसचे शहराध्यक्ष राजेंद्र माने असे गट कार्यरत आहेत. उपनगराध्यक्ष जयवंत पाटील यांनी राजीनामा द्यावा, असे बहुमतात असलेल्या जनशक्ती आघाडीतील काही नगरसेवकांचे म्हणणे होते. दरम्यान उपनगराध्यक्ष पाच वर्ष माझ्याकडे राहील" या अटीवर "उपनगराध्यक्षपद घेतले असल्याचे जयंतराव पाटील सांगतात. यामुळे उपनगराध्यक्ष बदलाचा प्रश्नच येत नाही. यशवंत आघाडी राजेंद्रसिंह यादव यांची, जनशक्ती आघाडी अरुण जाधव यांची तर लोकसेवा आघाडी जयवंतराव पाटील यांची आघाडी आहे. या तिघे पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली एकत्र आले होते. जयवंत पाटील यांच्याकडे उपनगराध्यक्षपद असल्यामुळे नगरपालिकेत दररोज जयवंत पाटील दिसतात. अरुण जाधव नगरपालिकेकडे फिरकतही नाहीत. तर राजेंद्रसिंह यादव आपल्या कामाचा व्याप सांभाळून, जेवढा वेळ देता येईल तेवढाच वेळ देतात. यामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत, ते कोण सोडवणार ? हा खरा प्रश्न निर्माण झाला आहे.
Image
वर्धन अग्रोने ऊस बिल त्वरित द्यावीत अन्यथा आंदोलन... सचिन नलवडे यांचा इशारा
Image
चहा नव्हे अमृततुल्य, कराडच्या युवकांचा अभिनव उपक्रम......शिवनेरी अमृततुल्य
Image