वाहगाव येथील दफनभूमीचा प्रश्न मार्गी खा.श्रीनिवास पाटील यांच्या पाठपुराव्याला यश


वाहगाव येथील दफनभूमीचा प्रश्न मार्गी
खा.श्रीनिवास पाटील यांच्या पाठपुराव्याला यश 


करा़ड -  वहागाव ( ता. कराड ) येथील अनेक वर्षापासून प्रलंबित असणारा  मुस्लिम समाज दफनभूमीचा प्रश्न खा. श्रीनिवास पाटील यांच्या प्रयत्नातून अखेर निकाली निघाला आहे. याबाबत मुस्लिम बांधवांनी खा.श्रीनिवास पाटील यांची भेट घेऊन आभार मानले.


वहागाव येथील मुस्लिम समाज दफनभूमीच्या जागेचा प्रश्न गेली कित्येक वर्षे प्रलंबित होता. त्यामुळे येथील मुस्लिम बांधवांना दफन विधीसाठी अनेक अडचणी येत होत्या. तर शासनाकडून दफनभूमीच्या विकासासाठी मिळणारा निधी तांत्रिक अडणीमुळे उपलब्ध होत नव्हता. दफनभूमीच्या जागेचा प्रश्न मिटावा म्हणून स्थानिक नागरिक अनेक वर्षापासून प्रयत्नात होते. मात्र त्यामध्ये वेळोवेळी अडथळे येत होते. यासंदर्भात मुस्लिम बांधवानी खा.श्रीनिवास पाटील यांना प्रत्यक्ष  भेटून यामध्ये आपण लक्ष घालून हा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढवा  अशी मागणी काही दिवसापूर्वी केली होती.  


    खा.श्रीनिवास पाटील यांनी साताराचे जिल्हाधिकारी यांच्याशी समन्वय साधून यासाठी प्रयत्न केले. तर प्रशासकीय त्रुटी दूर केल्या गेल्याने  दफनभूमीसाठी सार्वजनिक जागा मुस्लिम समाजाला देण्यात आली आहे. यासाठी वाहगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच शकुंतला पुजारी, उपसरपंच कुलदीप पवार यांनी सहकार्य केले. तर खा.श्रीनिवास पाटील यांनी वारंवार केलेल्या पाठपुराव्याने दफनभुमीचा प्रश्न कायमस्वरूपी सुटला आहे. त्यामुळे वाहगाव येथील मुस्लिम बांधवांनी खा.श्रीनिवास पाटील यांची भेट घेऊन आभार मानले. यावेळी समीर मुल्ला, अमिन मुल्ला, सलमाद्दीन मुल्ला, आयुब मुल्ला, गणीभाई मुल्ला, शकील सय्यद यांच्यासह मुस्लिम बांधव उपस्थित होते.


येथिल मुस्लिम समाजाच्या दफनभूमी जागेचा ब-याच वर्षापासून प्रलंबित असणारा प्रश्न खा.श्रीनिवास पाटील यांच्या प्रयत्नाने मार्गी लागला आहे. त्यामुळे मुस्लिम समाजात समाधानाचे वातावरण आहे.
- अस्लम कासम मुल्ला


Popular posts
जिल्हा परिषद पाझर तलावांची ठेका रक्कम कमी करावी..... सातारा जिल्हा मत्स्यव्यवसाय संघाचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांना निवेदन  
Image
सातारा जिल्ह्यातील नागरिकांचा लॉकडॉऊनला चांगला प्रतिसाद : पालकमंत्री बाळासाहेब पाटील 
Image
"काँग्रेस"ला गतवैभव प्राप्तसाठी पृथ्वीराजबाबा - विलासकाका यांच्यात सकारात्मक चर्चा : राज्यमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील
Image
नगरपालिकेच्या सभेत नगरसेवकांनी प्रशासन व मुख्याधिकार्‍यांना धरले धारेवर...विषयपत्रिकेवरील 90 विषय मंजूर; सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांचा नागरी सत्कार होणार
Image
ग्रामपंचायतीच्या मासिक सभांना अटींचे पालन केल्यास कलम 144 मधून सूट : जिल्हाधिकारी शेखर सिंह
Image