उज्वल भवितव्यासाठी योग्य वेळी योग्य निर्णय घेणे आवश्यक - जशराज पाटील 


उज्वल भवितव्यासाठी योग्य वेळी योग्य निर्णय घेणे आवश्यक - जशराज पाटील 


कराड - दहावीनंतर विद्यार्थ्यांना विविध शाखेत शैक्षणिक संधी उपलब्ध असतात. शैक्षणिक भवितव्य उज्वल करून चांगली कारकीर्द करण्यासाठी विद्यार्थ्यांनी योग्य वेळी योग्य निर्णय घेणे आवश्यक आहे असे प्रतिपादन सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचे नूतन संचालक व कराड उत्तरचे युवा नेते जशराज पाटील यांनी केले.


यशवंतनगर (ता. कराड )येथील सह्याद्री शिक्षण संस्थेच्या यशवंतराव चव्हाण विद्यालयाच्या एस.एस.सी. विद्यार्थी शुभचिंतन व पारितोषिक वितरण कार्यक्रम प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. संस्थेचे सचिव व्ही.एम. पोळ, सदस्य गोविंदराव थोरात, उपसरपंच लिनाताई जाधव, विरश्री करांडे यांची प्रमुख उपस्थिती होती.


 स्वर्गीय पी.डी.पाटील साहेब यांनी स्थापन केलेल्या विद्यालयाला उत्कृष्ट निकालाची परंपरा आहे. सहकार मंत्री नामदार बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार गुणवत्तापूर्ण आणि उपक्रमशील शाळा म्हणून नावलौकिक असणाऱ्या शाळेतील विद्यार्थ्यांनी शंभर टक्के निकालासाठी प्रयत्न करावेत असे आवाहनही त्यांनी याप्रसंगी केले.


दरम्यान विद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते गुणगौरव करण्यात आला. विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या हस्तलिखिताचे प्रकाशन मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. सानिका घुमरे वेदांतिका मोरे यांनी विद्यार्थी मनोगत व्यक्त केले.ए.आर. अर्जुगडे, एस.बी. जाधव यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणारे माणिकराव थोरात, भरत माने, पृथ्वीराज पाटील, आप्पासो चव्हाण , भार्गव थोरात माजी विद्यार्थी सिद्धार्थ चव्हाण, चंद्रकांत तुपे, मोहन चव्हाण दीपक मदने ,दिपक थोरात तसेच शिक्षक ,पालक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची प्रस्तावना मुख्याध्यापक एम.डी. चव्हाण यांनी केली सूत्रसंचालन एस.व्ही.चव्हाण यांनी तर आभार एस.एम. कदम यांनी मानले.