भाजपचे 25 फेब्रुवारी रोजी सातारा जिल्हाभर आंदोलन....सरकारला धरणार धारेवर.... डॉ.अतुल भोसले व विक्रम पावसकर यांची पत्रकार परिषदेत माहिती


भाजपचे 25 फेब्रुवारी रोजी सातारा जिल्हाभर आंदोलन....सरकारला धरणार धारेवर.... डॉ.अतुल भोसले व विक्रम पावसकर यांची पत्रकार परिषदेत माहिती


कराड -  महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांची फसवणुक केली आहे. सरकारच्या बेफीरीमुळे राज्यात महिलावरील आत्याचार वाढले आहेत. त्याच्या निषेधार्थ भारतीय जनता पक्षाच्यावतीने 25 फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, कराड, कोरेगाव, खंडाळे येथील तहसील कार्यालय, वाई येथे पोलिस ठाण्यासमोर तर महाबळेश्वर पंचायत समितीसमोर धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती भाजपचे चिटणीस अतुल भोसले व जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांनी येथे पत्रकार परिषदेत दिली.


मुकुंद चरेगावकर, भाजपचे शहराध्यक्ष एकनाथ बागडी, प्रमोद शिंदे, कराड दक्षिणचे धनाजी पाटील, संजय पवार, महिला मोर्चाच्या डाॅ. शुभांगी गावडे, प्रशांत कुलकर्णी, सिमा घार्गे, स्वाती पिसाळ यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.


भाजपचा विश्वासघात करुन कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसबरोबर सत्ता स्थापन केलेल्या शिवसेनेने शेतकऱ्यांचा विश्वासघात केला आहे. सरकार स्थापन करताना सेना प्रमुख व सध्याचे मुख्यमंत्री, कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जावुन अवकाळीग्रस्तांना हेक्टरी 25 हजार आणि फळबागांसाठी 50 हजार मदत करण्याची घोषणा केली होती. मात्र महाविकास आघाडीच्या नेत्यांना आश्वासनांचा विसर पडला आहे. नेत्यांनी यापैकी एकही आश्वासन पाळलेले नाही. महाविकास आघाडी सरकारची कर्जमाफी योजना ही शेतकऱ्यांची फसवणुक करणारी आहे. सरकारने फक्त अल्पमुदतीची पीककर्जे माफ करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे बहुसंख्य शेतकऱ्यांना त्याचा लाभ होणार नाही. सरकारने तुर खरेदीचे निकष बदलल्याने शेतकऱ्यांकडुन होणाऱ्या खरेदीचे प्रमाण कमी झाले आहे. शेतकऱ्यांची फसवणुक करणाऱ्या महाविकास आघाडी सरकारचा भाजपतर्फे आम्ही निषेध करत आहोत.


महिनाभरात महिलांवरील आत्याचार वाढले आहेत. महिलांवर आत्याचार करणाऱ्यांवर धाक बसवण्याएेवजी महाविकास आघाडी सरकारचे मंत्री गावोगावी सत्कार घेण्यात व्यस्त आहेत. हे सरकार सत्तेवर आल्यानंतर गुन्हेगारांना कायद्याचा धाक राहिलेला नाही. हिंगणघाड येथील प्रकरण, अॅसीडहल्ला, अल्पवयीन मुलींवर आत्याचार, बलात्कार, महिलांना जाळुन टाकणे अशा घटना वाढु लागल्या आहेत. त्यामुळे तरुणी, महिलांत भितीचे वातावरण आहे. त्यामुळे सरकारच्या निधेधार्थ मंगळवारी भाजपच्यावतीने धरणे आमदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती देवुन डॉ. अतुल भोसले व विक्रम पावसकर यांनी सर्वानी आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन केले.