कृष्णा कारखान्यावर 370 जणांची आरोग्य तपासणी


कृष्णा कारखान्यावर 370 जणांची आरोग्य तपासणी


कराड -  यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी कारखाना, सातारा जिल्हा परिषद आरोग्य विभाग व प्राथमिक आरोग्य केंद्र (रेठरे बुद्रुक) यांच्या संयुक्त विद्यमाने स्त्रीरोग व बाल आरोग्य तपासणी व उपचार शिबीरामध्ये 370 जणांची आरोग्य तपासणी करून मोफत उपचार करण्यात आले. कारखान्याचे उपाध्यक्ष जगदीश जगताप यांच्या हस्ते शिबीराचे उद्घाटन करण्यात आले. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद सदस्या शामबाला घोडके होत्या.


यावेळी गुणवंत पाटील, संजय पाटील, ब्रिजराज मोहिते, पांडूरंग होनमाने, कार्यकारी संचालक सुर्यकांत दळवी,  जि.प.सदस्य गणपत हुलवान, गटविकास अधिकारी डॉ.आबासाहेब पवार, कराड तालुका आरोग्य अधिकारी डॉ.संगीता देशमुख, मुकेश पवार, अरूण पाटील, रविंद्र देशमुख, जी.बी.मोहिते, विजय पवार उपस्थित होते.


जगदीश जगताप म्हणाले, आरोग्य प्रबोधनासाठी शिबीरे वारंवार राबविण्यात येतात. शिबीरांमुळे लोकांमध्ये जागरूकता निर्माण होते. तसेच तपासणी व उपचारही होत असतात. यावेळी जिल्हा परिषद सदस्या शामबाला घोडके यांनी मनोगत व्यक्त केले. प्राथमिक आरोग्य केंद्र वैद्यकिय अधिकारी डॉ. मैथीली मिरजे, डॉ.अनिता कदम, कृष्णा हॉस्पीटलचे वैद्यकिय पथक, कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे वैद्यकिय अधिकारी डॉ.हर्षल निकम यांचे शिबीरास सहकार्य लाभले.