स्वातंत्र्यवीर दादासाहेब उंडाळकर यांचा आज 45 वा स्मृतीदिन उंडाळे येथे स्वातंत्र्यसैनिक अधिवेशन


स्वातंत्र्यवीर दादासाहेब उंडाळकर यांचा आज 45 वा स्मृती दिन ंडाळे, ता. कराड येथील स्वातंत्र्यवीर दादासाहेब उंडाळकर यांचा 46 वा स्मृतिदिनानिमित्त आज मंगळवार, दि. 18 फेब्रुवारी रोजी स्वातंत्र्यसैनिक अधिवेशन होत आहे. यानिमित्त दादासाहेब उंडाळकर यांच्या कार्याचा घेतलेला आढावा...!

 

स्वातंत्र्यपूर्व काळात स्वातंत्र्याचा स्वप्नपूर्तीसाठी आणि सर्वकष प्रबोधनासाठी सिध्द झालेला उंडाळ्याचा ग्रामीण परिसर हा एका स्वयंभू व्यक्तिमत्वाने दीपवला होता. हे तेजोमय व्यक्तिमत्व म्हणजे स्वातंत्र्यसैनिक दादा उंडाळकर 1942 च्या "चले जाव' आंदोलनात कराडच्या तहसील कार्यालयावर हजारो सत्याग्रहीचा मोर्चा आणून त्यांनी निर्भयशील कार्याचे दर्शन घडवले. राजकीय क्रांती एवढेच ध्येय न ठेवता सामाजिक सुधारणा हाच खरा प्रबोधनाचा मूलमंत्र आहे. या विश्वासाने स्वातंत्र्योत्तर त्यांनी राजकारण व सत्ता यापासून अलिप्त राहून समाजकार्य हे ध्येय बनविले.

 

जनसेवेतून परिवर्तनाची परिभाषा दादा उंडाळकरांनी निर्माण केली. प्रबोधनातून परिवर्तनाचा वस्तुपाठ समाज पुरुषापुढे ठेवला. जाती भेदाच्या पारंपरिक वृत्तीवर कडाडून हल्ला करुन सामाजिक स्पष्ट वक्तेपणा, निर्मळ मन आणि उक्ती तशी कृती. यामुळे ते समान्याचे आधारवडठरले.महात्माजींच्या चळवळीचे सच्चे पाईक, समाज सुधारक, विचारवंत, दीन दलितांचे कैवारी व 42 च्या क्रांतीचे अग्रदूत असलेल्या दादा उंडाळकरांची प्राणज्योत 18 फेब्रुवारी 1974 ला मालवली.ंची आदर्शवत स्मृती पंचक्रोशीत जपली. त्यांच्या प्रथम स्मृतिदिनी  उंडाळे येथे जमलेल्या नागरीकांनी उत्स्फूर्तपणे स्वा. दादा उंडाळकर समितीची स्थापना केली.स्मारक समितीने त्यांच्या पवित्र स्मृतीला काही संकल्पाचे अर्ध्य वाहिले.

 

उंडाळे येथे भव्य स्मारक मंदीर उभारले. कराड येथे दादांचा अर्धाकृती पुतळा उभारण्यात आला. शिवाजी विद्यापीठात बी. ए. ला राज्यशास्त्र व एल. एल. बी. परिक्षेत प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यासाठी शिष्यवृत्ती सुरु केली. उंडाळे येथील स्मारकासमोर दादांचा अर्धपुतळा बसविण्यात आला. महाविद्यालयीन विद्यार्थ्याच्या निवासाच्या सोयीसाठी कराड येथ अद्ययावत वसतिगृहाची सोय केली. दरवर्षी उंडाळे येथे दादांच्या पुण्यतिथी दिनी स्वातंत्र्य संग्रामसैनिकांचे राज्यव्यापी अधिवेशन, समाज प्रबोधनात्मक व्याख्यानमाला याबरोबरच 1991 पासून समाज प्रबोधन, ग्रामीण मराठी साहित्य संमेलन आयोजनास सुरवात झाली. हे त्यांचे दोन्ही उपक्रम इतके यशस्वी झाले की, आज उंडाळे हे देशव्यापी स्वातंत्र्य सैनिकांचे मुक्त व्यासपीठ बनले आहे.

 

24 ऑगस्ट 1942 चा मोर्चा एकूण पाच मोर्चापैकी पहिलाच होता. लोकांसाठी ही नवीनच कल्पना होती. उंडाळे येथील बाळकृष्ण पाटील यांच्या नेतृत्वाखाली हजारो लोक अत्यंत शिस्तीने कराड येथील मामलेदार कचेरीवर चालून आले. कचरीच्या कंपाउंड बाहेर भरलेल्या सभेत एक पोलीस अधिकारी आला. त्याने मोर्चाचे नेतृत्व करणाऱ्या दादा उंडाळकर यांना अटक केल्याचे सांगीतले. त्यानंतर सशस्त्र पोलिसांनी जमावावर हल्ला केला. तथापि मोर्चाचे नेतृत्व करणारे दादा उंडाळकर लगेच उभे राहीले व त्यांनी सर्व लोकांना शांत राहण्यास सांगीतले. व जमावाला उद्देशून ते म्हणाले, आपला मोर्चा यशस्वी झाला आहे. विजय आपलाच आहे. आता आपण शातंपणे परत फिरा. जे आपणास अटक करु इच्छितात. त्यांनाच अटक करण्याइतपत आपण या घटकेला सामर्थ्यवान आहोत. पण तो या मोर्चाचा उद्देश नाही. मला झालेली अटक मी स्विकारली आहे. "करा आणि मरा' हा गांधीजींचा संदेश आहे. पण त्याबरोबर त्यांनी अहिंसेेचे पालन करण्याबद्दल ही बजावले आहे.

 

आता जर आपण हिंसाचारी कृत्य केले, तर महात्माजींना आवडणार नाही. उलट त्यांना अतिशय दु:ख होईल. म्हणून तुम्ही शांततेने परत जा. स्वातंत्र्याचा लढा गांधीजींच्या मार्गाने पुढे चालवा. ही जणू काही गांधीजीच्या नावाने घेतलेली शपथ होती. लोकांनी आपल्या नेत्याचा आदेश मानला. व अत्यंत शांततेने घरी परतले. उंडाळकरांच्या कार्याचा व्यक्तिमत्वाचा हा विजय होता.