कोरोना वायरसमुळे अडकलेले चीनमधील हिंदुस्थानी लवकरच मायदेशी परतणार


कोरोना वायरसमुळे अडकलेले चीनमधील हिंदुस्थानी लवकरच मायदेशी परतणार


कराड - जगाला हादरुन टाकणारा कोरोना व्हायरस जेथे आहे. त्या चीनमधील वुहानमध्ये दहा फेब्रुवारीपासून मी देशवासियांना मदतीची हाक देत होते. सोशल मिडियाच्या माध्यामातून साद घालत होती. या माझ्या हाकेला उत्तम प्रतिसाद मिळाला. मी आणि देशवासीय लवकरच मायदेशात परतणार आहे. कोरोना साथ सुरु झाल्यापासून चीनमध्ये अडकलेल्या मी व माझ्यासह सुमारे 90 देशवासियांना जे धैर्य दिले ते आम्ही आयुष्यभर विसरु शकणार नाही. आम्ही लवकरच परतू असा संदेश आज (बुधवार) वुहानमधील मराठमोळ्या अश्‍विनी पाटील हिने ट्विट केले आहे.


दरम्यानमं (ता.25) आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनीही देशातील 90 नागरीक चीनमधून लवकरच परतणार असल्याची माहिती ट्विटरवरुन दिली हाेती.काेराेना व्हायरसमुळे चीनमधील हिंदुस्थानी नागरीकांना परतण्यास विलंब लागत होता. त्यातच काही नागरीकांना तांत्रिक अडचणींमुळे मायदेशात परतता येत नव्हते. यामध्ये साताऱ्यातील अश्‍विनी पाटील हिचा समावेश आहे. तिने पासपोर्ट दूतावास कार्यालयात जमा केल्याने यापुर्वी हिंदुस्थानातून आलेल्या विमानातून प्रवास करता येणे शक्‍य नव्हते. त्यातच तिचे पती आजारी असल्याने तिने वुहानमध्येच थांबणे पसंत केले.


काही दिवसांनंतर पूढील उपचारार्थ तिचे पती पोलंडला रवाना झाली. एकीकडे कोरोनाची भयवाह परिस्थिती आणि दूसरीकडे मायदेशी परतण्याची उत्कंठा होती. परंतु त्यातून मार्ग निघत नव्हता. अखेरीस अश्‍विनीने दहा फेब्रुवारीस सकाळच्या प्रहरी एका व्हिडिओच्या माध्यमातून हिंदुस्थान सरकारकडे मदतीची अपेक्षा व्यक्त केली. त्यानंतर एका वृत्त वाहिनीस दिलेल्या मुलाखतीत तिने चीन आणि हिंदुस्थान सरकार कोरोना व्हायरसमुळे निर्माण झालेली परिस्थिती हाताळण्यात कोठेही कमतरता जाणवत नसल्याचे स्पष्ट केले होते. साधारणतः 25 मिनीटांच्या मुलाखतीत तिने वूहानमधील भयवाह परिस्थितीचे कथन केले परंतु त्यातूनही आम्ही सुरक्षित असल्याची खात्री दिली होती.


अश्विनी पाटील यांनी मदतीची अपेक्षा व्यक्त केल्यानंतर सातारा जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी वुहानमधील हिंदुस्थानीयांना परत मायदेशी आणण्यासाठी प्रयत्न सुरु केले. यामध्ये आमदार पृथ्वीराज चव्हाण, खासदार श्रीनिवास पाटील, माजी खासदार उदयनराजे भोसले हे सातत्याने प्रशासनाशी संपर्कात राहिले. तसेच आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी केंद्रीय स्तरावर तसेच वुहानमधील दूतावास कार्यालयात सातत्याने पाठपूरावा करुन हिंदुस्थानीयांना पाठबळ देत राहिले.आज वुहानमधून आम्ही लवकरच देशात येणार असल्याचे नमूद केले आहे.


Popular posts
अशासकीय पदावरील नियुक्त्या रद्द ......महाराष्ट्र राज्य सहकारी परिषद, राज्यस्तरीय लेखा समिती, राज्य कृषि मूल्य आयोग
Image
राज्य शासनामार्फत पत्रकारांसाठी गृह योजना राबवून घरे उपलब्ध करून द्यावीत : जेष्ठ पत्रकार आप्पासाहेब पाटील
Image
कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी कोणाला नको आहेत ! मुख्याधिकारी यशवंत डांगे यांना हटविण्याचा प्रयत्न सुरू
Image
प्रदेश युवक काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी शिवराज मोरे यांची निवड
Image
महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी 1 हजार 306 कोटी निधी वितरीत करण्यास मान्यता..सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांची माहिती
Image