समलिंगी व विवाहबाह्य संबंधाच्या तक्रारीकरिता निवारण केंद्र

 


समलिंगी व विवाहबाह्य संबंधाच्या तक्रारीकरिता निवारण केंद्र


कराड - प्रत्येक जिल्ह्यात तक्रार निवारण केंद्र महिलांसाठी आहे. या अंतर्गत समलिंगी व विवाहबाह्य संबंधाची 6 प्रकरणे या केंद्रात दाखल झाली आहेत. अशा संबंधाविषयी तक्रार निवारण केंद्रात पिडीत महिला मौन तोडून धिटाईने तक्रार मांडत आहेत, ही महत्त्वपूर्ण बाब अधोरेखित करावी लागेल. न्याय व्यवस्था, पोलिस ठाणे, वकील आदी ठिकाणी वेळकाढूपणामुळे तक्रारदार नकारात्मक विचार करतात, ही बाब संपूर्ण न्यायीक व्यवस्थेला प्रश्न उपस्थित करणारी आहे. दरम्यान समलिंगी व विवाहबाह्य संबंधामुळे अन्यायग्रस्त आहेत. त्यांना तात्काळ न्याय देण्याच्या दृष्टीने तक्रार निवारण केंद्र अत्यंत महत्त्वाचे आहे.


वैवाहिक जीवनात सुखी संसार चाललेला असताना अनेक वेळा विवाहबाह्य संबंधांमुळे सुखी संसाराची राखरांगोळी होण्याची वेळ येते. पती विरोधात तक्रार करण्याचे धाडस पत्नी करीत नाही अथवा एखाद्या महिलेने हे धाडस केले तर तिला योग्य न्याय मिळेल याची खात्री नसते. यामुळे अशा प्रकरणामुळे कौटुंबिक अनेक प्रश्न निर्माण होत आहेत.दरम्यान "तक्रार निवारण केंद्र" येथे रीतसर तक्रार दाखल केल्यानंतर या तक्रारीची गंभीर दखल घेऊन त्यावर तोडगा काढला जातो. आणि संबंधितांना समज देऊन सुखी संसाराची वाट सुलभ करण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र तक्रारीनुसार तडजोड झाली नाही तर कायदेशीर कारवाईचा मार्ग अवलंबिला जातो. वास्तविक अशा विकृत व्यक्तींच्यावर कारवाई होणे अत्यंत महत्त्वाचे आहे.


निसर्ग नियमानुसार पती-पत्नी एकत्र राहून संसार करीत असतात मात्र समाजामध्ये विकृती असणारे अनेक व्यक्ती आहेत. अल्पवयीन मुली व मुलांच्या सोबत समलिंगी संबंध निर्माण करून त्यांच्यावर दबाव निर्माण करतात. समलिंगी संबंधाबाबत फारशी वाचता होत नाही अथवा या संबंधाने कुठे न्याय मागावा याची फारशी माहिती नसल्या कारणास्तव समलिंगी संबंधाचे प्रकार उघड होत नाहीत. अन्यायग्रस्त गुपचुपपणे शारीरिक व अनैसर्गिक संबंधाची वाचता करीत नाहीत. जोर जबरदस्तीने धमकावून जर समलिंगी संबंध कोणी प्रस्थापित केले असेल तर त्यांनादेखील तक्रार निवारण केंद्रांमध्ये न्याय मागता येतो. बहुतांश वेळेला अब्रूला भिऊन समलिंगी संबंधाच्या तक्रारी होत नाहीत. दरम्यान ज्या व्यक्तीबरोबर समलिंगीसंबंध होतो अशी व्यक्ती मानसिक दृष्ट्या संतुलन गमावण्याची शक्यता असते. यामुळे समलिंगी संबंधात अडकलेल्या अथवा ज्याच्याशी असा अनैसर्गिक संबंध येतो त्या व्यक्तीला आधार देणे आवश्यक आहे.


समलिंगी व विवाहबाह्य संबंधाबाबत तक्रारी दाखल होत आहेत. तक्रार निवारण केंद्रामार्फत अशा समलिंगी, विवाहबाह्य तक्रारींची योग्य दखल घेऊन या तक्रारींवर कारवाई केली जात आहे. यामुळे विवाहबाह्य संबंध प्रस्थापित करणाऱ्या व्यक्तीला कठोर शासन होण्याच्या दृष्टीने तक्रार निवारण केंद्रामार्फत कार्यवाही केली जात आहे. त्याचबरोबर समलिंगीसंबंधच्या अनुषंगाने तक्रारींची वाच्यता अथवा अधिक चर्चा होणार नाही याची खबरदारी घेतली जाते. अन्याय पीडित व्यक्तीला न्याय देण्याच्या दृष्टीने तक्रार निवारण केंद्र गंभीरपणे काम करीत आहे. विवाहबाह्य संबंध ठेवणे, समलिंगी संबंध प्रस्थापित करणे ही विकृती आहे. याबाबत प्रथमता प्रबोधन केले जाते. याबाबतचे तोटे समजावून सांगितले जातात. सुसंस्कारित व्यक्तिमत्त्वामध्ये हे दोन्ही संबंधांना संमती नाही. तडजोडीने प्रकरण मार्गी लावण्याचा प्रयत्न होतो अन्यथा रिसर कठोर कायदेशीर कारवाई तक्रार निवारण केंद्रामार्फत विवाहबाह्य संबंध, समलिंगी संबंधाबाबत केली जात आहे.