शेतकऱ्यांच्या संदर्भातील विविध प्रश्नांबाबत विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली बैठक


शेतकऱ्यांच्या संदर्भातील विविध प्रश्नांबाबत विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली बैठक


मुंबई - शेतकऱ्यांच्या संदर्भातील विविध प्रश्नांबाबत किसान काँग्रेसच्या विविध मागण्यासंदर्भात विधानभवनात विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली.


यावेळी सन 2018 चा दुष्काळी निधी वाटप, उच्च न्यायायलाच्या आदेशाच्या अनुषंगाने सन 2015च्या खरीप हंगामात विदर्भातील 11862 गावांना जाहीर केलेला नुकसान भरपाई, प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेची अंमलबजावणी, जंगली प्राण्यापासून होणारे नुकसान टाळण्यासाठी उपाय योजना आदी विविध विषयांवर यावेळी चर्चा झाली.


श्री. पटोले म्हणाले, बीटी बियाणे वापरूनही विदर्भातील शेतकऱ्यांना बोंड अळीचा प्रादुर्भाव जाणवला आहे. त्यामुळे यंदाच्या हंगामात शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये, यासाठी बोगस बियाणे व खत विक्रीविरुद्ध कडक कारवाई करावी. सन 2015 च्या खरीप हंगामातील नुकसान भरपाईचा प्रस्तावावर कारवाई करावी.  तसेच सन 2018 मध्ये झालेल्या खरीप पिकाच्या नुकसानीच्या भरपाईसाठी केंद्राकडे प्रस्ताव पाठवावा. जंगली जनावरांमुळे होणारे नुकसान टाळण्यासंदर्भातील प्रस्ताव पुन्हा एकदा सादर करण्यात यावे. तसेच या योजनेची प्रक्रिया सुलभ करण्यासंदर्भात केंद्र शासनाकडे पाठपुरावा करावा, असेही त्यांनी सांगितले.


प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेची व्यापक प्रमाणात जनजागृती करावी, असे कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले. श्री. पवार यांनी विविध मागण्यांवर कार्यवाही करण्याची मागणी केली. कृषी मंत्री दादाजी भुसे, आमदार अमित झनक, बळवंत वानखेडे, माजी आमदार विरेंद्र जगताप, किसान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष देवानंद जगताप, कृषी विभागाचे सचिव एकनाथ डवले आदी उपस्थित होते.