नववीत शिकणारा अथर्व गोंधळी झाला डॉक्टर..... कराडच्या सायकलिंग स्पर्धेचा बॅन्ड अॅम्बेसिडर


नववीत शिकणारा अथर्व गोंधळी झाला डॉक्टर
कराडच्या सायकलिंग स्पर्धेचा बॅन्ड अॅम्बेसिडर 


कराड - कोल्हापूर जिल्ह्यातील डॉ. अथर्व संदीप गोंधळी, (रा.टोप, ता.हटकणंगले) लहान वयात केलेले काम उत्कृष्ट असून नववीत शिकत असतानाच डॉक्टरेट पदवी संपादन केली आहे. दरम्यान कराड येथे होणाऱ्या सायकलींग स्पर्धेसाठी डॉ. अथर्व गोंधळी याची बॅन्ड अॅम्बेसिडर म्हणून निवड केली आहे. 


डॉ. अथर्व संदीप गोंधळी सध्या मदर इंग्लिश मिडीयम स्कूल, (पेठवडगांव, जि. कोल्हापूर) मध्ये ९ वीत शिकत आहे. डॉ.अर्थव वयाच्या ५ व्या वर्षापासून तायक्वांदो, सायकलिंग, त्रायथोलोन अशा विविध खेळामध्ये प्राविण्य प्राप्त केले असून २०१७ मध्ये राष्ट्रीय व अंतरराष्ट्रीय स्तरावर २३ पारितोषिके मिळवली आहेत. अथर्व गोंधळी याला ज्या क्षेत्रात आणि आवडीप्रमाणे त्याचे करियर व्हावे यासाठी आई-वडील त्याला प्रोत्साहन देत आहेत. दरम्यान अथर चे आई वडील डॉक्टर असून मुलाने डॉक्टर व्हावे अशी मनीषा होती मात्र अथर्वच्या लहान वयातील नेत्रदीपक कामगिरीची दखल घेत 'द डायसेस ऑफ एशिया. (चेन्नई) यांनी "डॉक्टरेट इन अथलेटिक" ही पदवी डॉ. अथर्व यास बहाल केली आहे.


अथर्व गोंधळी याने ३० नोव्हेंबर २०१७ रोजी "पर्यावरण वाचवा" चा संदेश देत सलग १२ तास २९६ की.मी.सायकलिंग करून नवीन ६ जागतिक विक्रमांची नोंद केली आहे. आत्तापर्यंत ९ जागतिक विक्रमाची नोंद डॉ.अथर्व याचे नावे आहेत. सध्याच्या स्पर्धेच्या युगात आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागते तसेच प्रदुषण मुक्त आयुष्य जगण्यासाठी पर्यावरणाशी समतोल राखणे आवश्यक झाले आहे. नागरिकांमध्ये सायकलींगची आवड निर्माण व्हावी व निरोगी आयुष्य जगता यावे याकरीता कराड ते सायकलिंग स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी डॉ. अथर्व गोंधळी याची बॅन्ड अॅम्बेसिडर म्हणून निवड केली असल्याचे पत्र दीपक देवकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.


 


Popular posts
अशासकीय पदावरील नियुक्त्या रद्द ......महाराष्ट्र राज्य सहकारी परिषद, राज्यस्तरीय लेखा समिती, राज्य कृषि मूल्य आयोग
Image
पोलंड येथे राहणाऱ्या आपल्या राज्यातील वनसगांवचे वैभव शिंदे यांनी लिहीलेली ही पोस्ट... मुद्दाम आपणा सर्वांसाठी वाचा आणि सगळ्यांना सांगा.... जीवन सुंदर आहे दक्षता घेऊ या...!
Image
हणबरवाडी - धनगरवाडी योजनेचा पहिला टप्पा मार्च - २०२१ पर्यंत कार्यान्वित होणार...किवळ व खोडजाईवाडीचा प्रस्ताव द्यावा
Image
ग्रामपंचायतीच्या मासिक सभांना अटींचे पालन केल्यास कलम 144 मधून सूट : जिल्हाधिकारी शेखर सिंह
Image
48 तासात बँकेत जमा झाली रक्कम.....शेतकऱ्यांना चैतन्य देणारी कर्जमुक्ती