म. जोतिराव शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्‍या आधार प्रमाणीकरणास प्रारंभ.....मोरगाव व सासवडला शुभारंभ


म. जोतिराव शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्‍या आधार प्रमाणीकरणास प्रारंभ.....मोरगाव व सासवडला शुभारंभ


पुणे - महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेची पुणे जिल्‍ह्यातील सासवड आणि मोरगाव येथील पहिली यादी जाहीर झाली असून सायंकाळी 5 वाजेपर्यंत 1 लक्ष 51 हजार 863 खाती अपलोड करण्‍यात आली  आहेत. त्‍यापैकी  निवडलेल्‍या दोन गावांतील  विशिष्‍ट क्रमांकासह कर्ज खाती 551 तर आधार प्रमाणीकरण झालेली खाती 271 असल्‍याची माहिती जिल्‍हा उप निबंधक अशोक कुंभार यांनी दिली.


सासवड आणि मोरगांव येथे महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत आधार प्रमाणीकरण नोंद पावती कार्यक्रमाचा शुभारंभ झाला. यावेळी विभागीय सहनिबंधक श्रीमती संगीता डोंगरे,  पुणे जिल्‍हा मध्‍यवर्ती सहकारी बँकेचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी प्रतापसिंह चव्‍हाण, सहायक निबंधक महेश गायकवाड, सहायक निबंधक हर्षिद तावरे यांची प्रमुख उपस्थिती होती.


पुणे जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांची माहिती संकलित करण्यात आली असून  निवडलेल्‍या दोन गावातील पात्र शेतकऱ्यांची यादी पोर्टलवर उपलब्ध झाली आहे. ही यादी संबंधित बँक व ग्रामपंचायत येथे प्रसिद्ध करण्यात आली आहे.  सासवड आणि मोरगाव या दोन्ही गावातील शेतकऱ्यांच्या आधार प्रमाणीकरणाचे काम सुरळीतपणे सुरु असल्‍याचेही श्री. कुंभार यांनी सांगितले.  प्रल्‍हाद तुकाराम खोमणे आणि बाळासाहेब गेनबा बोरावके या शेतकऱ्यांनी कर्जमुक्ती योजनेच्या जलद अंमलबजावणीबद्दल समाधान व्यक्त करुन शासनाला धन्यवाद दिले.


दरम्‍यान, महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजनेचा लाभ देण्याचा राज्‍यस्‍तरीय शुभारंभ मुख्यमंत्री उद्धव  ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते  विधानभवनात झाला. त्यानिमित्त परभणी, अहमदनगर आणि अमरावती जिल्ह्यातील लाभार्थी शेतकऱ्यांशी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी व्हीडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. पुणे जिल्‍हाधिकारी कार्यालयात व्हीडीओ कॉन्फरन्सिंगसाठी सहकार आयुक्‍त अनिल कवडे आणि इतर अधिकारी उपस्थित होते.


 
                                                  


Popular posts
"बंडातात्या"लाही संपवायचे होते, पंढरपूर हत्याकांडातील आरोपी बाजीराव बुवा कराडकराची खळबळजनक कबुली
Image
लोकनेते बाळासाहेब देसाईसाहेब यांचे कार्य अजरामर....लोकनेतेसाहेब यांच्या कार्याला शोभेल असे काम करु या...यशराज देसाई
Image
डॉ. अतुल भोसले यांचा विरोधकांना सवाल...इतरांच्या नावावर बोगस कर्ज का घेतले ? त्यांना तुरूंगात का जावे लागले ? या प्रश्‍नांची उत्तरे हिंमत असेल तर द्यावीत 
Image
कोरोना लस संशोधन प्रकल्पात कृष्णा हॉस्पिटलचा सहभाग कराडचे नाव झळकणार जगाच्या नकाशावर; पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटकडून लस विकसित
Image
सहकारमहर्षी जयवंतराव भोसले पतसंस्थेचे नव्या वास्तूत स्थलांतर
Image