नेहरु युवा केंद्राच्या युवा गौरव पुरस्काराने सौ.मधुराणी थोरात सन्मानित

 



नेहरु युवा केंद्राच्या युवा गौरव पुरस्काराने सौ.मधुराणी थोरात सन्मानित

कराड - भारत सरकारच्या युवा कार्यक्रम व क्रिडा मंत्रालयातर्गंत नेहरु युवा केंद्र, सातारा यांच्यावतीने सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल दिला जाणारा युवा गौरव पुरस्कार ओंड, ता.कराड येथील सौ.मधुराणी आनंदा थोरात यांना प्रदान करण्यात आला.


भारत सरकारच्या युवा कार्यक्रम व क्रिडा मंत्रालयातर्गंत नेहरु युवा
केंद्र, सातारा यांच्यावतीने आयोजित जिल्हा युवा संमेलनात युवा गौरव
पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी महाबळेश्वर येथील सनराईज कॅन्डल्सचे सीईओ  भावेशभाटीया, जिल्हा परिषद सदस्या सौ.अर्चना देशमुख, महिला आर्थिक विकास  महामंडळाचेजिल्हा समन्वयक कुंदन शिनगारे, समाजकार्य पदवीका महाविद्यालयाच्या प्राचार्या शाली जोसेफ, पेस ट्रेनिंग इन्स्टिटयूटचे संचालक युवराज भंडलकर, नेहरु युवा केंद्र, सातारा जिल्हा समन्वयक कालिदास घाटवळ, तिर्री गोपी, पोलीस उपनिरिक्षक राजेंद्र यादव, लेखाधिकारी भानुदास
दव यांची उपस्थिती होती.


सौ.मधुराणी आनंदा थोरात या ज्ञानदीप राष्ट्रीय सामाजिक व शैक्षणिक विकास संस्थेच्या माध्यमातून 2009 सालापासून आरोग्य, ग्रामीण विकास, शिक्षण, पर्यावरण व महिला बालकल्याण आणि कौशल्य विकास क्षेत्रात नाविण्यपुर्ण उपक्रम राबवित आहेत. कराडमधील ज्ञानदीप कौशल्य विकास केंद्राच्या माध्यमातून शहरासह चौदाव्या वित्त आयोगातर्गंत गावापासून वाडीवस्तींपर्यंत विविध कौशल्य विकास प्रशिक्षण देवून अनेकांना विशेषत: महिलांना व्यवसाय उभारणीसाठी मार्गदर्शन केले आहे. राज्य महिला आयोगाच्यावतीने महिलांसाठी कायदे व हक्कविषयीक आणि विशेषत: डिजिटल साक्षरता
प्रशिक्षण व कार्यशाळा घेतली आहे. केंद्र सरकारच्या महिला व बालकल्याण मंत्रालयातर्गंत राष्ट्रीय जनसहयोग एवं बालविकास संस्थानच्या (निपसीड) असुरक्षित महिलांसाठी समुपदेशन विषयी कार्यशाळेत मिळालेल्या ज्ञानाद्वारे  असुरक्षीतमहिलांसाठी समुपदेशन करण्याचे काम करत आहेत. शासनाच्या यशदाच्या माध्यमातून प्रशिक्षक म्हणून ग्रामविकास विकास आराखडा निर्मितीसाठी ग्रामपंचायत पदाधिकारी व गावस्तरावरील कर्मचार्यांना
प्रशिक्षण देण्याचे काम केले आहे. केंद्र सरकारच्या नेहरु युवा केंद्र,
सातारा यांच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या उपक्रमांत सहभागी होण्याबरोबरच कौशल्य विकास प्रशिक्षणासाठी प्रशिक्षक म्हणूनही रोगदान दिले आहे. नेहरु युवा केंद्राच्या विविध उपक्रमांत सहभाग नोंदविला आहे.


सनबीम व ज्ञानदीप संस्थेच्या माध्यमातून महिलांसाठी डिजीटल साक्षरता कार्यशाळा यशस्वीपणे घेतल्या आहेत. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन उन्नती योजना अभियान (कराड तालुका पंचायत समिती) येथे समुह साधन व्यक्ती (बीआरपी) म्हणून कार्य करताना महिला बचत गटांच्या सक्षमीकरणासाठी योगदान दिले आहे. कराड पंचायत समिती स्तरावर महिला तक्रार निवारण समिती सदस्या  म्हणून त्या कार्यरत आहेत. सामाजिक अंकेक्षण अंतर्गंत रोजगार हमी योजनेचे
कराड तालुकास्तरावर सीआरपी म्हणून कार्यरत असताना रोजगार हमी योजनेच्या कामांची तपासणी करुन रोहयोचे महत्व आणि जॉबकार्डधारकांचे हक्कांविषयी जागृती केली आहे. त्याचबरोबर अनेक सामाजिक उपक्रमांत त्यांचा सहभाग आहे.



डॉ.पंजाबराव देशमुख निर्वाह भत्ता योजनेंतर्गत सुरु असलेल्या यशवंतराव चव्हाण मुलींचे वसतीगृहात नाविण्यपुर्ण उपक्रम राबविण्यासाठी त्या योगदान देत आहेत. कोरो, मुंबई यांच्या माध्यमातून एकल महिलांचे संघटन उभारण्यासाठी त्यांनी कापील, गोळेश्‍वरसह कराड तालुक्यात चळवळ उभारण्यास प्रारंभ केला आहे. एकल महिलांचे एकसंघ करुन त्यांचा बचत गट उभारणीसह
त्यांच्या आरोग्य, शिक्षण व उपजिविका याकरिता विविध उपक्रम राबविण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला असून त्यांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी कार्यकत्यांकरिता नेतृत्वविकास कार्यक्रम प्रभावीपणे राबवित आहेत. महिला व बालविकास विभागाच्यावतीने कराड येथील आशाकिरण महिलांचे शासकीय वसतीगृहात समुपदेशन करण्यासाठी त्यांना नियुक्त केले आहे. नेेहरु युवा केंद्राच्या उपक्रमांबरोबरच सामाजिक क्षेत्रातील त्यांच्या या योगदानाबद्दल त्यांना युवा गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.  युवागौ पुरस्कार मिळाल्याबद्दल सौ.मधुराणी थोरात यांचे सर्वत्र
अभिनंदन होत आहे.