बळीराजा शेतकरी संघटनेचे आंदोलन
कराड - शेतकर्यांच्या संयमाचा अंत संपला केन शुगर (ता कडेगांव) कारखान्यावर बळीराजा शेतकरी संघटनेचे मागील हंगामातील थकित एफआरपी संदर्भात ठिय्या आंदोलन करण्यात आले आहे.
बळीराजा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष साजिद मुल्ला यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. कारखाना प्रशासनाने शेतकऱ्यांच्या संयमाचा अंत पाहू नये, तसेच दिवसा शेतकरी बिल मागण्यांसाठी येतोय म्हणून कारखाना प्रशासनाने दिवसा ऊस गोळा करून संध्याकाळी कारखाना चालू करण्याची नवीन पद्धत चालू केली आहे. आता शेतकऱ्यांनी संघर्ष तीव्र करण्याचा निर्णय घेतला आहे. दिवस रात्र कष्ट करून पिकविलेल्या ऊसासाठी कारखान्यावर एखाद्या भिकार्या सारखे पैसे मागण्याची वेळ कारखाना प्रशासनाने शेतकऱ्यांच्यावर आणली आहे.
खरं तर शेतकऱ्यांना पिकविण्यापासून ते विकण्यापर्यंत संघर्ष करावा लागतो. याकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी लक्ष घालावे आणि शेतकऱ्यांना न्याय द्याव, असे बळीराजा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष साजिद मुल्ला यांनी सांगितले कारखाना प्रशासनाने लेखी 5 मार्च रोजी उसबील जमा करतो असे लेखी लिहून दिल्यानंतर ठिय्या आंदोलन स्थगित करण्यात आले. परंतू दिलेल्या आश्वासनाला प्रमाणे जर त्या तारखेला बिल जमा झाले नाही तर 6 मार्च रोजी सकाळी सर्व शेतकरी आपल्या मुलाबाळांसमवेत कारखान्याच्या गव्हाणीत ऊड्या टाकून कारखाना बंद पाडण्याचा इशारा बळीराजा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष साजिद मुल्ला यांनी दिला.