बचत गटाच्या माध्यमातून महिलांच्या स्वविकासाला चालना


बचत गटाच्या माध्यमातून महिलांच्या स्वविकासाला चालना


कराड  - बचत गटाच्या माध्यमातून महिलांनी एकत्रितपणे स्वविकासाला चालना देऊन २० महिला बचत गटांच्या सामाजिक उपक्रमांमध्ये महिलांचा सहभाग उल्लेखनीय असतो‌ असे प्रतिपादन दत्तानाना प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रमोद देशमाने यांनी व्यक्त केले. 


वडोली भिकेश्वर (ता.कराड) येथील दत्तानाना प्रतिष्ठानच्यावतीने महिला बचत गटासाठी  विविध खेळांच्या स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धाचे बक्षीस वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमोद देशमाने, पत्रकार प्रवीण कांबळे, डॉ. शिवप्रसाद गोरे, सातारा जिल्हा महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वयक कुंदन शिनगारे, संतोष कारंडे, सरपंच मंदाकिनी साळूंखे, महिला बचत गटाच्या समन्वयक जब्बीन काझी,  यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. २० बचत गटातील महिलांनी स्पर्धेत सहभाग घेतला होता. 


खो-खोमध्ये प्रथम क्रमांक नवरत्न बचत गट, कबड्डीमध्ये विभागून देण्यात आला. यशोधरा महीला बचत गट व नवरात्र बचत गटास रस्सीखेचमध्ये प्रथम क्रमांक, भारती बचत गटास १०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत प्रथम क्रमांक तसेच  पुनम घाडगे यांना व्दितीय तर  सुनिता निकम यांनी तृतीय क्रमांक मिळवला.  मनीषा निकम यांनी  लिंबू चमचा स्पर्धेत प्रथम क्रमांक सारिका कुंभार, द्वितीय रेश्मा शिलवंत व तृतीय क्रमांक सुनिता निकम यांनी मिळवला.  गृहोपयोगी वस्तू बक्षीस स्वरूपात देवून महिलांचा सन्मान करण्यात आला. 


यावेळी  अमोल पवार,  उपसरपंच  शंकर शेडगे, ग्रामपंचायत सदस्या सीमा तुपे, दिपाली मोरे, अधिक साळुंखे, राजेश घाडगे, नामदेव साळुंखे, अशोक पाटील, ग्रामपंचायत सदस्य, विकास सेवा सोसायटीचे सदस्य, सर्व महिला गटाच्या अध्यक्षा, उपाध्यक्षा महिला सदस्या, ग्रामस्थ उपस्थित होते.