बहारदार शास्त्रीय भरतनाट्यम व गायनाने महोत्सवाची सांगता. रात्रभर महाशिवरात्री जागर कार्यक्रमात मर्दानी खेळ, योग, आसने व भजन

बहारदार शास्त्रीय भरतनाट्यम व गायनाने महोत्सवाची सांगता.

रात्रभर महाशिवरात्री जागर कार्यक्रमात मर्दानी खेळ, योग, आसने व भजन 

 

 सातारा - येथील श्री उत्तर चिदंबरम नटराज मंदीराच्या महारुद्र,महाशिवरात्री संगीत व नृत्यमहोत्सवात सातारच्याच नटराज कला शाळा नृत्यसंस्थेच्या गुरु सौ. आंचल घोरपडे यांच्यासह 25 कलाकारांनी भरतनाट्यम नृत्याचे बहारदार सादरीकरण केले.त्यानंतर रात्रभर ते शनिवारी पहाटे पर्यंत सादर झालेल्या गायन, मर्दानी खेळ, योग, प्राणायाम, सांप्रदायीक भजनासह कलाकारांनी सादर केलेल्या गायनने महोत्सवाची सांगता केली. याचवेळी 4 युवा चित्रकारांनी विविध विषयांवर चित्रे काढत एक अनोखा अविष्कार साकारला. 

 

 दरम्यान या महाशिवरात्री निमित्त आयेाजीत केलेलेया धार्मीक कायर्ंक्रमात तसेच महाशिवलिंगाचे दर्शनासाठी मंदिरास सायंकाळी अनेकांनी परिवारासह भेट देत शिवलिंगाचे दर्शन घेतले. कोरेगाव तालुक्याचे आमदार महेश शिंदे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसमवेत मंदिराला भेट देवून पहाणी केली. तसेच मंदिराच्या विविध उपक्रमाचे कौतुक केले. यावेळी या सर्व मान्यवरांचा सत्कार मंदिराचे विश्‍वस्त रमेश शानभाग,सौ.उषा शानभाग यांचे हस्ते शाल,श्रीफळ देउन करण्यात आला. 

 

नटराज नृत्यशाळेच्या कलाकारांनी नटराज मंदिरातील परमपूज्य शंकराचार्य श्री चंद्रशेखरेंद्र सरस्वती महास्वामी कला मंदंीराच्या भव्य स्टेजवर आपल्या नृत्यकार्यक्रमाची सुरुवात भरतनाट्यम शिकणार्‍या नवीन मुलींनी पुष्पांजली ने करत त्यानंतर विघ्नहर्त्या गणरायाचे ..गणेश पंचरत्न स्त्रोत्र .. सादर झाले. 

 

भरत नाट्यम मधील शास्त्रीय नृत्य प्रकार अर्थात जतीस्वरम हे रागमालिका रागात आणि मिश्र चापु तालात सादर होउन भगवान शंकराची महिमा वर्णन करणारी शिवपदम हा नृत्य प्रकार कन्नड भाषेत राग मालीका रागात आदी तालात ओमकार नाद व डमरुचा आवाज त्यामूळे नागही तालावर कसे डोलतात या वर विधी खंदारे ने सुरेख नृत्य साकारले तमीळ भाषेतील मुखारी रागात आदी तालात या भक्ती पदावर नृत्याचे सुरेख दर्शन घडले,  हे शिव शंकर या रचनेवर नृत्य सादर होताना वाईट शक्तींचा नाश करणारा भगवान शंकर, पार्वती माता व शंकर यांच्यातील कामदेवाकडून निर्माण होणारी प्रेम भावना आदींचे वर्णन असणारी चतूश्र एकम तालातील हिंदी भजन सादर झाले. नटेशकौतुकम या रचनांवर  नृत्याची अदाकारी झाली. 

 

प्रवास करताना हा प्रवास चांगला व्हावा यासाठी भगवान शंकराला आळवणी करणारे अनवट  असे ..मार्गबंधू स्तोत्र.. सादर झाले. बाहूबली तांडव या नृत्य सादरीकरणात साधनेची कसब नृत्यातून दाखवत कलाकारांनी उपस्थित शेकडो प्रेक्षकांची मने जिंकली. मैसुर जती हंसध्वनी रागात आदी तालात या रचनेवर नृत्य सादर होवून शिवकामा सुंदरी या नाट्यावर नृत्याच्या लिलया छटा दाखवत ..वृंदावनी वेणू .. भिम पलासी रागात आदी तालात सादर होवून आदीतालातील तिल्लाना व  मंगलमने या कायर्ंक्रमाची सांगता केली. बेळगाव येथील  स्व.गुरु आर.मोहन राव यांची शिष्या असलेल्या ऑचलने गेली 35 वर्षे आपली ही नृत्य साधना सुरु ठेवली आहे. नुकतेच त्यांचे 20 जानेवारी रोजी बेळगाव येथे निधन झाले. 

 

गायन कार्यंक़्रमात सौै उषा शानभाग, श्रीमती सुनिात लिमये व सौ. शुभांगी थत्ते यांनी अभंग सादर केले..यावेळी सौ..उज्वला नानल यांनी राग कोमल ऋषभ व आसावरी गायला तर इंदिरा अलाटकर यांनी भैरव, सौ. संगीता कोल्हापूरे यांनी गुणक्री, यश कोल्हापूरे यांनी नट भैरव, सौ. प्रज्ञा लाटकर यांनी विलासखानी तोडी रागाचे गायन केले.  भानुदास ओतारी यांनीतबला साथ तर संवादिनी साथ बाळासाहेब चव्हाण याांनी केली.   

 

नृत्यामध्ये सहभागी झालेल्या गुरु सौ.आंचल घोरपडे सह ओवी गायकवाड, काव्या खामकर, ऋचा भोकरे, अनन्या पोतदार, श्रेया गाढवे, भूवी खत्री, अनन्या कदम, आकांक्षा कणसे, स्वरा गुजर, चैत्राली खंदारे, संस्कृती कुलकर्णी, प्राची कांबळे, दुर्वा नलवडे, वैष्णवी जडेयार, सौ स्मीता किर्दत, अनुष्का कांबळे, सौ. योगिता केसरकर, सौ, रिचा त्यागी, श्रृती झेले, करीना शेट्टे, अनुष्का फडणीस, विधी खंदारे, नम्रता शिरढोणे, ऋचिरा इंगळे या 25 शिष्यांंसह चित्रकार यांचा  सत्कार मानचिन्ह व प्रशस्तीपत्रे देवुन करण्यात आला.यावेळी कांची कामकोटी पिठाच्या वतीने प्रतिनिधी म्हणून आलेले अ‍ॅड. श्रीनिवासन व श्री. बालसुब्रमण्यम यांच्या हस्ते मंदिर व शानभाग विद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने सुरु करण्यात आलेल्या ओजस या मासिकाचा प्रकाशन समारंभ करण्यात आला. या वेळी नटराज मंदीराचे विश्‍वस्त रमेश शानभाग, मुकुंद मोघे,रणजीत सावंत,के.नारायण राव,वासुदेवन नायर,मंदिराचे व्यवस्थापक चंद्रन, विश्‍वनाथ शेट्टी, रमेश हलगेकर, राहूल घायताडे, चित्रकार पी.बी.तारु सर तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. रात्री 9 वा.महाशिवरात्री जागर कार्यक्रमाला सुरुवात झाली. यामध्ये कार्यक्रमाचे दिपप्रज्वलन होवून त्यानंतर स्वरसाधना संगीत विद्यालयाचे गुरु सुधांशु किरकिरे यांची गणेश वंदना सादर होणार आहे. त्यानंतर रात्री दहा वाजता सौ. प्राजक्ता चव्हाण या शिवमहिमा कथन करणार आहे. रात्री साडे दहा ते साडे अकरा या वेळेत वासोळा ग्रामस्थ भजनी मंडळाचा भजन कार्यक्रम होवून रात्री साडे अकरा वाजता शिवलिंग भिमस्वराज्य ग्रूप अतित यांचे विविध मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके सादर झाली. रात्री साडेबारा वाजता प्रतिक सदामते व सचिन राजोपाध्ये यांचे गिटार व तबला वादन झाले तसेच सौ जोशी व सौ स्वरदा राजोपाध्याय यांच्या गायनानी रंगत आली. रात्री दीड वाजता सौ. उषा शानभाग जप व ध्यान या विषयावर मार्गदर्शन होवून पहाटे साडे तीन वाजता सदगुरु शिवयोग कार्यक्रम असून पहाटे साडे चार वाजता ओंकार, आसने, प्राणायाम होवून पहाटे साडे पाच ते सहा या वेळेत महाआरती व शिवदर्शन सोहळा संपन्न होवून या कार्यक्रमाची सांगता झाली.