शेतकरी चिंतामुक्त

शेतकरी चिंतामुक्त


महाराष्ट्रातला शेतकरी नैसर्गिक आपत्तीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसानग्रस्त झाला होता. शेतकरी अनेक विवंचनेत अडकल्यामुळे शेतकऱ्यांना चिंतामुक्त करण्याची घोषणा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली होती. महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आल्यानंतर राज्यातील शेतकऱ्यांना चिंतामुक्त करणार अशी हमी ही उद्धव ठाकरे यांनी दिली होती. दिलेल्या वचनाप्रमाणे उद्धव ठाकरे यांनी राज्यातील शेतकऱ्यांना चिंतामुक्त केले आहे. यामुळेच परभणीच्या शेतकऱ्याने मुख्यमंत्र्यांसह राज्यातील प्रमुख लोकप्रतिनिधींना लग्नाला यावे असे निमंत्रण दिले आहे. साहेब, कर्जमुक्तीची रक्कम जमा होणार आहे. आता मुलीच्या लग्नाची चिंता नाही. तुम्हीही लग्नाला या.. ! हे वाक्य आहे चिंतामुक्त झालेल्या शेतकऱ्यांची प्रातिनिधिक स्वरूपातील प्रतिक्रिया. विठ्ठलराव गरूड कर्जबाजारी होते शेतीसाठी त्यांनी कर्ज घेतले होते दरम्यान राज्य सरकारने कर्जमाफीचा निर्णय घेतल्यानंतर विठ्ठल गरुड यांना या कर्जमाफीचा लाभ मिळाला आणि विठ्ठल आनंदित झाले. वारंवार शेतकरी राज्य शासनाकडून केवळ संकटात सापडल्यामुळे आम्हाला मदत करावी अशी मागणी करत आहे दरम्यान सरकार पक्षात असलेले शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रीय काँग्रेस हे शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेत आहेत दरम्यान विरोधात असणारे भारतीय जनता पार्टीतील लोकप्रतिनिधी विरोधाला विरोध करायचे म्हणून केवळ या कर्जमाफीवर राजकारण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विठ्ठल गरुड यांनी मुलीच्या लग्नाचे निमंत्रण दिले आहे आता पाहुया हे दोघे आपल्या व्यस्त वेळापत्रकानुसार वेळ काढून शेतकऱ्यांच्या मुलीच्या लग्नाला जातात किंवा नाही हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. दो ठाकरे ठाकरे सरकारने "महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती" या नावाने योजना सुरू केली आहे.शेतकऱ्यांना कर्जमाफी देताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भूमिका होते की, शेतकऱ्यांना हेलपाटे मारायला लागू नयेत, लायनीत उभारून ऑनलाईनचा अर्ज भरता उपयोगाचा नाही, याचपद्धतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कर्जमाफीची रक्कम जमा केली.शिवसेनेचे वैशिष्ट्य मध्ये दिलेले वचन पूर्ण करण्याची प्रामाणिकता त्यांच्याकडे आहे दरम्यान शिवसेनेबरोबर सरकार पक्षांमध्ये असलेले काँग्रेस व राष्ट्रवादी सुद्धां शेतकऱ्यांबाबत नेहमी संवेदनशील असते. विठ्ठलराव गरूड यांच्या मुलीच्या लग्नाच्या निमंत्रणावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुभेच्छा व सदिच्छा व्यक्त केल्या आहेत. ज्यातील बळीराजांना कर्जमुक्तीतून चिंतामुक्त करणाऱ्या योजनेची अंमलबजावणी केवळ ६० दिवसात झाली आहे. शेतकऱ्यांना कर्जमुक्ती देण्याचा उद्देश स्पष्ट करताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कर्जमुक्त होऊन शेतकऱ्याला पुन्हा काळ्या आईची सेवा करता यावी. शेतीतून चांगले उत्पादन घेता यावे यासाठी महा विकास आघाडीने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्याचे सांगितले. ३५ दिवसांमध्ये ३५ लाख कर्ज खात्यांची माहिती गोळा करण्याचे महत्त्वपूर्ण काम प्रशासकीय पातळीवर झाले ते केवळ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिलेल्या आदेशामुळे. "महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती" योजनेंतर्गत ३४ लाख ८३ हजार ९०८ शेतकरी खात्यांची माहिती जमा झाली आहे. १५ हजार ३५८ शेतकऱ्यांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. योजनेंतर्गत ३५ दिवसांमध्ये ३५ लाख कर्ज खात्यांची माहिती गोळा करण्यात आली आहे. वास्तविक पाहता महाविकास आघाडीने घेतलेला निर्णय हा अत्यंत महत्त्वाचा असून शेतकऱ्यांना चिंतामुक्त करण्यासाठी हा निर्णय शेतकऱ्यांना आनंदित करणारा आहे.