अशोकरावांनी सर्वसामान्यांसाठी काम केले
पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांचे प्रशसोद्गार, वाढदिवसानिमित्त सत्कार
कराड (प्रतिनिधी) - प्रियदर्शनी संस्था समूहाचे संस्थापक अशोकराव पाटील यांनी सर्वसामान्य जनतेसाठी काम केले आहे, असा प्रशंसोद्गार जिल्हय़ाचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी काढले.
अशोकराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या सत्कार कार्यक्रमात ते बोलत होते. खासदार श्रीनिवास पाटील, माजी नगराध्यक्षा शारदा जाधव, नगरसेवक आप्पा माने, इंद्रजित गुजर, माजी नगरसेवक मोहनराव शिंदे, सुभाष डुबल, ऍड. मानसिंगराव पाटील, प्रदीप जाधव, नंदकुमार बटाणे, संभाजी सुर्वे, अरूण पाटील, ऍड. विकास पवार, सागर बर्गे, यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
पालकमंत्री बाळासाहेब पाटील म्हणाले की, अशोकराव पाटील यांनी स्वस्त धान्य दुकानदार, रिक्षाचालक अशा सर्वसामान्यांच्या संघटनांना आधार दिला आहे. शिवाजी क्रीडा मंडळ, नगरपालिका या माध्यमातून सर्व स्तरात समरसून काम केले आहे.
सर्वसामान्यांसाठी लढण्याचे काम त्यांनी सुरू ठेवावे -खा. श्रीनिवास पाटील
खासदार श्रीनिवास पाटील म्हणाले की, अशोकराव पाटील यांना भविष्यात चांगली संधी मिळेल. त्यांनी सतत सर्वसामान्य जनता केंद्रबिंदू मानून काम केले आहे. कराड परिसरात निरपेक्ष भावनेने काम करणारी तरूण पिढी पुढे येण्यासाठी दादांनी यापुढील काळात काम करावे. सर्वसामान्यांसाठी लढण्याचे काम त्यांनी सुरू ठेवावे. त्यांना यासाठी सर्वतोपरी मदत करू.
यावेळी आप्पासाहेब गायकवाड, प्रा. हणमंत कराळे, संजय मोहिते, हरिष जोशी, शारदा जाधव, नंदकुमार बटाणे, माधवराव पवार, प्रदीप जाधव, माधवराव पवार, ऍड. मानसिंगराव पाटील यांची भाषणे झाली.
दरम्यान, वाढदिवसानिमित्त अशोकराव पाटील यांना दिवसभर शुभेच्छा देण्यासाठी जिल्हय़ातील विविध संस्थांच्या पदाधिकाऱयांनी गर्दी केली होती. सायंकाळी आयोजित सत्कार कार्यक्रमास आजी माजी नगरसेवकांसह विविध पक्ष, संघटनांचे पदाधिकारी, त्यांचे कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
आजी-माजी नगरसेवकांकडून शुभेच्छा कराडमध्ये माजी नगरसेवकांची संघटना शहराच्या प्रलंबित प्रश्नांसाठी कार्यरत आहे. या संघटनेचे उपाध्यक्ष म्हणून अशोकराव पाटील काम पाहात आहेत. या कार्यक्रमाच्या निमित्ताने माजी नगरसेवकांनी मोठय़ा संख्येने उपस्थित राहात त्यांना शुभेच्छा दिल्या. याबरोबरच पालिकेतील विद्यमान नगरसेवकांनीही त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.