प्रा. रघुनाथ केंगार नॅशनल बेस्ट टीचर ऑवर्डने सन्मानित


प्रा. रघुनाथ केंगार नॅशनल बेस्ट टीचर ऑवर्डने सन्मानित


कराड - वेणूताई चव्हाण महाविद्यालयाचे मराठी विभागाचे प्रा. डॉ. रघुनाथ केंगार यांना २०२० चा "नॅशनल बेस्ट टिचर ऑवर्ड" देऊन समारंभपूर्वक गौरविण्यात आले. शैक्षणिक सामाजिक, सांस्कृतीक क्षेत्रातील लक्ष्यवेधी योगदानाबद्दल त्यांना आविष्कार सोशल अँन्ड एजुकेशनल फ़ॉऊन्डेशन (कोल्हापूर) तर्फे पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे.


प्रा.डॉ.रघुनाथ केंगार यांनी शिक्षण क्षेत्रात तीन दशके केलेले अध्यापन विद्यार्थीप्रिय शिक्षक म्हणून मिळविलेले यश, म. रा. पाठयपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधनमंडळ,(पुणे) यांनी स्वीकृत केलेले १ ली ते ८ वी मूल्यशिक्षण शिक्षकांच्या दृष्टिकोनातून सद्यस्थितीचा अभ्यास या संशोधन प्रकल्पातील शिफारशीचा परिणाम म्हणून पाठयपुस्तकात भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचा शाळेला समावेश, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरचे सिनेट सदस्य म्हणुन केलेले कार्य, विविध मराठी साहित्य संमेलनाचे आयोजक तसेच संमेलनाध्यक्ष म्हणून केलेले काम, सदाचार अर्थात नैतिक मूल्याचे शिक्षण या ग्रंथाचे लेखन, शिक्षण प्रसारासाठी दिलेली हजारो व्याख्याने, आकाशवाणी केंद्रावरून प्रसारित झालेली चिंतनपर भाषणे, पीएचडीचे मार्गदर्शक म्हणून संशोधक विद्यार्थ्यांना केलेले मार्गदर्शक केले आहे. 


याप्रसंगी फ़ॉन्डेशनचे अध्यक्ष संजय पवार, मराठवाडा विभागीय अध्य्क्ष प्रा. डॉ. संतोष भोसले, ऑवार्ड सिलेक्शन कमिटीचे सदस्य राममूर्ती रायसिंग (जळगाव), मिसेस नीलिमा बोरा (आसाम ), प्राचार्य डॉ. अविनाश सांगोलेकर, मिसेस वानी, प्रा डॉ . प्रभाकर पवार, कृष्णकांत हजारिका, प्रा. माणिक बनकर उपस्थित होते. 


Popular posts
अशासकीय पदावरील नियुक्त्या रद्द ......महाराष्ट्र राज्य सहकारी परिषद, राज्यस्तरीय लेखा समिती, राज्य कृषि मूल्य आयोग
Image
पुणे जिल्ह्यातील "लॉकडाऊन" यंत्रणांच्या समन्वयाचा उत्कृष्ट नमुना
गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई शिवसेना पक्षवाढीसाठी आघाडीवर... शासनाच्या माध्यमातून पक्षसंघटनेला बळकटी देण्याचा प्रयत्न......मंत्रीपदाच्या ५० दिवसात दाखवून दिला उल्लेखनीय कार्याचा करिष्मा
Image
कोरोना ( कोव्हिड-19 ) संसर्गाची भिती कोणाला ? काय करायचे आणि काय करायचे नाही
Image
  "कृष्णा"मधून आजच्या 6 रुग्णांबरोबर 12 रुग्ण बरे झाले कोरोना संकटावर मात : आशादायक व सकारात्मक चित्र
Image