जनकल्याण पतसंस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त "गीत रंग" कार्यक्रमाने रसिक मंत्रमुग्ध


जनकल्याण पतसंस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त "गीत रंग" कार्यक्रमाने रसिक मंत्रमुग्ध 


कराड - मुख्य गायक रविंद्र साठे, मुख्य गायीका सावनी रविंद्र यांच्या अप्रतिम गायनाने सजलेली गीत रंग हा गाण्यांचा भारदार कार्यक्रम रसिकांच्या हृदयात कायमचा कोरला गेला. यामध्ये गायक रविंद्र साठे, गायीका सावनी रविंद्र, हेमंत वाळूजकर, चैत्राली अभ्यंकर, यांनी अनेक गाणी सादर केली. मराठमोळ्या भावगीतांसह सूरमधुर गाण्यांनी मैफलीला चांगलाच रंग भरला होता.


जनकल्याण नागरी सहकारी पतसंस्थाच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त सातारा येथे "गीत रंग" हा गाण्यांचा कार्यक्रम सातारा येथील शाहू कला मंदिर येथे उत्स्फूर्तपणे पार पडला. गीत रंग या कार्यक्रमाला रसिकांनी मोठा प्रतिसाद देऊन प्रत्येक गाण्यावर वाहवा करीत प्रतिसाद दिला.


रविंद्र साठे, सावनी रविंद्र, हेमंत वाळूजकर, चैत्राली अभ्यंकर यांनी आपल्या सूर मधुर गायनाने रसिकांना मंत्रमुग्ध केले होते. पंचतुंड नर (नांदी), आधी बीज एकले, धुंद मधुमती, त्या तिथे पलीकडे, धुंदी कळ्यांना, संधिकाली, शुक्रतारा, जिवलगा कधी रे येशिल तु, सावर रे, कुणाच्या खांद्यावरती, रेसमाच्या रेघानी, कुणीतरी बोलवा दाजीबाला, मी रात टाकली,लिंगोबाचा डोंगर अशी गाणी सादर केली. वादळे वारे, सख्या रे घायाळ मी हरीणी, या जन्मावर, मन उधाण वाऱ्याचे, मराठी पाऊल पडते पुढे या गाण्यांचं नवी-जुनी अनेक गाणी सादर केल्याने कार्यक्रमाची शोभा वाढविली. 


कार्यक्रमास सभासद, ग्राहक रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
मिळाला. मध्यंतरामध्ये संस्थेचे अध्यक्ष चंद्रशेखर देशपांडे यांनी संस्थेविषयी थोडक्यात माहिती दिली. या वेळी संस्थेचे संचालक उपस्थित होते.


Popular posts
"बंडातात्या"लाही संपवायचे होते, पंढरपूर हत्याकांडातील आरोपी बाजीराव बुवा कराडकराची खळबळजनक कबुली
Image
अशासकीय पदावरील नियुक्त्या रद्द ......महाराष्ट्र राज्य सहकारी परिषद, राज्यस्तरीय लेखा समिती, राज्य कृषि मूल्य आयोग
Image
मातंग समाजाच्या उन्नतीसाठी काम करणार ....लहुजी शक्तीसेना कराड शहराध्यक्षपदी सुरज घोलप यांची निवड
Image
"काँग्रेस"ला गतवैभव प्राप्तसाठी पृथ्वीराजबाबा - विलासकाका यांच्यात सकारात्मक चर्चा : राज्यमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील
Image
विशेष मुलाखत : पुणे आयुक्त दीपक म्हैसेकर सर्वांच्या सहकार्याने कोरोनावर निश्चितपणे मात करता येईल...
Image