शेणोली शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात


शेणोली शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात


कराड (प्रतिनिधी) - शेणोली (ता. कराड) येथील जिल्हा परिषद प्राथमिक मुले व मुलींच्या शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न झाले. कराडचे पोलीस उपअधीक्षक सूरज गुरव यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.


यावेळी कोल्हापूरचे मोटार वाहन निरीक्षक चैतन्य कणसे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी कर्नल संभाजीराव कणसे यांच्या प्रयत्नातून साकारलेल्या जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीची व गुणवत्तेबद्दल श्री. गुरव यांनी प्रशंसा केली. स्नेहसंमेलनात पहिली ते चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी बहारदार नृत्यांचे सादरीकरण केले.


शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राहुल पाटील यांनी प्रास्ताविक केले. त्यांनी शाळेत एसएमएस सुविधा, विध्यार्थी बचत बँक, सर्व खोल्यांमध्ये स्मार्ट टिव्ही व इंटरनेट सुविधा आहे. त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम राबविले जातात, असे सांगितले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रवीण पाटील, हणमंत कणसे, अजय चव्हाण, अनिल कणसे, अमृत कोष्टी, विद्याधर गायकवाड, विनायक मंडावले, आण्णा कुंभार यांनी परिश्रम घेतले. यावेळी सरपंच, उपसरपंच, विकास सोसायटीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.