सातारा जिल्ह्यातील शिक्षकांना मुख्याध्यापकपदी पदोन्‍नतीसह मिळाली पसंतीनुसार शाळा 


सातारा जिल्ह्यातील शिक्षकांना मुख्याध्यापकपदी पदोन्‍नतीसह मिळाली पसंतीनुसार शाळा 


कराड - सातारा जिल्हा परिषदेने प्राथमिक शिक्षण विभागातील गेल्या दहा वर्षांपासून प्रलंबित असलेल्या 117 शिक्षकांना मुख्याध्यापकपदी पदोन्‍नती दिली आहे. मुख्याध्यापकांना प्रशासनामार्फत ऑनलाईन ऑर्डर देण्यात आल्या आहेत.


सातारा जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागातील मुख्याध्यापक पदोन्‍नतीची प्रक्रियेला 2010 पासून ब्रेक लागला होता. शिक्षक संघटना व मराठा क्रांती मोर्चांच्यावतीने याबाबत आवाज उठवला जात होता. जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेतही सदस्यांनी प्रलंबित प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी केली होती. विविध राजकीय पदाधिकारी व शिक्षक संघटनांनी पदोन्नतीबाबत वारंवार विनंती केली होती. दरम्यान प्रशासनाने मुख्याध्यापक पदाच्या पदोन्नतीची प्रक्रिया पूर्ण करून 117 शिक्षकांना मुख्याध्यापक पदी पदोन्नती देण्यात आली आहे.आणि पसंतीनुसार शाळाही देण्यात आल्या आहेत.


जिल्हा परिषदेच्यावतीने शिक्षकांना मुख्याध्यापकपदी पदोन्नती देण्यात आली. मात्र, लेखी आदेश प्राप्त होत नसल्याने मोठ्या प्रमाणात नाराजी निर्माण झाली होती. प्राथमिक शिक्षक संघटना व प्राथमिक शिक्षक समितीच्यावतीने आंदोलनाचा इशारा दिला गेला होता. त्याचबरोबर जिल्हा परिषद अध्यक्ष उदय कबुले, शिक्षण सभापती मानसिंगराव जगदाळे यांना यांना सदर प्रश्न रखडल्याची माहिती देण्यात आली. शिक्षकांना मुख्याध्यापक पदोन्नतीचे नियुक्‍ती आदेश देण्यात यावा अशा सूचना मिळाल्यानंतर ऑनलाईन मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत यांच्या सहीनिशी तात्काळ नियुक्तीपत्र देण्यात आली.


Popular posts
अशासकीय पदावरील नियुक्त्या रद्द ......महाराष्ट्र राज्य सहकारी परिषद, राज्यस्तरीय लेखा समिती, राज्य कृषि मूल्य आयोग
Image
राज्य शासनामार्फत पत्रकारांसाठी गृह योजना राबवून घरे उपलब्ध करून द्यावीत : जेष्ठ पत्रकार आप्पासाहेब पाटील
Image
कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी कोणाला नको आहेत ! मुख्याधिकारी यशवंत डांगे यांना हटविण्याचा प्रयत्न सुरू
Image
प्रदेश युवक काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी शिवराज मोरे यांची निवड
Image
महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी 1 हजार 306 कोटी निधी वितरीत करण्यास मान्यता..सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांची माहिती
Image