महाबळेश्वर परिसरातील स्थानिक व पर्यटकांना उत्तम वैद्यकीय सुविधा मिळाव्यात.....ग्रामीण रुग्णालय हस्तांतरण करारास मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव तातडीने पाठवा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे..........रुग्णालयास भेट व रुग्णांची आस्थेवाईकपणे विचारपूस


महाबळेश्वर परिसरातील स्थानिक व पर्यटकांना उत्तम वैद्यकीय सुविधा मिळाव्यात.....ग्रामीण रुग्णालय हस्तांतरण करारास मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव तातडीने पाठवा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
-------------------------------------
रुग्णालयास भेट व रुग्णांची आस्थेवाईकपणे विचारपूस


सातारा - महाबळेश्‍वर येथील ग्रामीण रुग्णालय पाचगणी येथील प्रसिद्ध बेल एअर हॉस्पिटल आणि रेड क्रॉस संस्थेस पुढील वर्षासाठी देखील हस्तांतरित करण्यासंदर्भातील प्रस्ताव तातडीने शासनाकडे पाठवावा. कोणत्याही परिस्थितीत महाबळेश्वर- पाचगणी परिसरातील स्थानिक व पर्यटक यांना मिळणाऱ्या वैद्यकीय सुविधांमध्ये खंड पडू नये असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. 


आज मुख्यमंत्र्यांनी स्वत: मोरारजी गोकुळदास ग्रामीण रुग्णालयास भेट दिली व संबंधितांशी चर्चा केली. यावेळी उद्योग मंत्री सुभाष देसाई, गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई, जिल्हाधिकारी शेखर सिंह, जिल्हा पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते, जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी संजय भागवत  आदींची उपस्थिती होती. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रुग्णालयातील उपचार घेत असलेल्या रुग्णांची देखील आस्थेवाईकपणे विचारपूस केली. 


महाराष्ट्र शासनाने एका वर्षासाठी प्रायोगिक तत्वावर हस्तांतरित करण्याच्या निर्णयाने ग्रामीण रूग्णालयाच्या कारभारात सुधारणा झाली आहे असे यावेळी अधिकाऱ्यांनी निदर्शनास आणून दिले. जगप्रसिध्द पर्यटनस्थळ म्हणून ओळख असणार्‍या महाबळेश्‍वरमध्ये फक्‍त एकच ग्रामीण रूग्णालय असल्याने स्थानिक व पर्यटकांना फार अडचणी निर्माण होत होत्या. या रूग्णालयामध्ये पुरेशा वैद्यकीय सुविधा मिळण्यासाठी राज्य शासनाने पाचगणी येथील बेल एअर  हॉस्पिटलला प्रायोगिक तत्वावर हस्तांतरीत केले होते. या संस्थेशी असलेला करार संपुष्टात आल्याने मुख्यमंत्र्यांनी नवा प्रस्ताव त्वरित शासनास पाठविण्याचे निर्देश दिले. वैद्यकीय अधिकार्‍यांची रिक्त पदे भरने व इतर समस्या दूर करण्याबाबत तातडीने कार्यवाहीचे आदेश देण्यात येतील असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.Popular posts
"बंडातात्या"लाही संपवायचे होते, पंढरपूर हत्याकांडातील आरोपी बाजीराव बुवा कराडकराची खळबळजनक कबुली
Image
अशासकीय पदावरील नियुक्त्या रद्द ......महाराष्ट्र राज्य सहकारी परिषद, राज्यस्तरीय लेखा समिती, राज्य कृषि मूल्य आयोग
Image
मातंग समाजाच्या उन्नतीसाठी काम करणार ....लहुजी शक्तीसेना कराड शहराध्यक्षपदी सुरज घोलप यांची निवड
Image
"काँग्रेस"ला गतवैभव प्राप्तसाठी पृथ्वीराजबाबा - विलासकाका यांच्यात सकारात्मक चर्चा : राज्यमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील
Image
विशेष मुलाखत : पुणे आयुक्त दीपक म्हैसेकर सर्वांच्या सहकार्याने कोरोनावर निश्चितपणे मात करता येईल...
Image