श्री संतकृपा कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये राष्ट्रीय कार्यशाळा संपन्न
कराड - श्री संतकृपा शिक्षण संस्था घोगाव (ता.कराड) आणि थर्मोफिशर सायन्टिफिक पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने बायोटेक व बायोफार्म या क्षेत्रातील संशोधनातील नवनवीन आव्हाने व संधी या विषयावरील दोन दिवसीय कार्यशाळा नुकतीच संपन्न झाली.
सदर कार्यशाळेचे उद्घाटन सचिव प्रसून जोहरी यांच्या हस्ते संपन्न झाले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.विजयानंद आरलेलीमठ होते. यावेळी संस्थेच्या सर्व महाविद्यालयाचे प्राचार्य यांची प्रमुख उपस्थिती होती.
सदर कार्यशाळेचे उद्घाटन सचिव प्रसून जोहरी यांच्या हस्ते संपन्न झाले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.विजयानंद आरलेलीमठ होते. यावेळी संस्थेच्या सर्व महाविद्यालयाचे प्राचार्य यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्रसून जोहरी म्हणाले, विद्यार्थ्यांनी अशा प्रकारच्या कार्यशाळेमध्ये उत्साहाने सहभागी होवून संशोधनासाठी लागणारी नवनवीन कला व कौशल्ये आत्मसात करावी व त्याचा उपयोग मानवी जीवन सुखकारक होण्यासाठीकरावा.
सदर कार्यशाळेमध्ये थर्मोफिशर सायंन्टिफिकमध्ये कार्यरत असलेले स्वप्नील काशिद व डॉ.अरींदम चक्रबोरती प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. त्यांनी या क्षेत्रातील संधी तसेच कॅन्सर, मधुमेह या सारख्या आजारावरील संशोधन याबाबतचे मार्गदर्शन केले व या आजारावर नियंत्रण करणार्या उपकरणाचे प्रात्यक्षिक यावेळी दाखवले.
तसेच डॉ.चित्रलेखा कुलकर्णी यांनी मानवी जनुकांच्या विषयी माहिती दिली. तसेच या क्षेत्रातील संशोधनासाठी लागणार्या नविन उपकारणांची तंत्रज्ञानावर आधारीत प्रात्यक्षिके दाखविण्यात आली.
सदर कार्यशाळेमध्ये महाराष्ट्र, कर्नाटक व गोवा राज्यातील फार्मसी कॉलेजमधील विद्यार्थी बहुसंख्येने सहभागी झाले होते. या प्रसंगी पोस्टर प्रेझेंटेशन स्पर्धेत रिसर्चमध्ये तात्यासाहेब कोरे फार्मसी महाविद्यालयाचा विद्यार्थी ओंकार पाटील याने प्रथम क्रमांक मिळवला, भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ फार्मसी कोल्हापूर येथील विद्यार्थिनी निधी पाटील हिने द्वितीय क्रमांक मिळवला तर तृतीय क्रमांक तात्यासाहेब कोरे महाविद्यालयाची विद्यार्थिनी तेजस्विनी जाधव हिने मिळवला. तर रिव्ही विभागात श्री संतकृपा कॉलेज ऑफ फार्मसीने घवघवीत यश मिळवले. तीनही क्रमांक या महाविद्यालयाने पटकावले.
यामध्ये विनायक गायकवाड प्रथम, रोहन सूर्यवंशी द्वितीय तर शुभांगी पानसरे या विद्यार्थिनीनेे तृतीय क्रमांक पटकावला. विजेत्या विद्यार्थ्यांना प्रमुख आतिथींच्या हस्ते सन्मानपत्र देवून गौरविण्यात आले.सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ममता थोरात व अतुल कदम यांनी केले.
सदर कार्यशाळेसाठी संस्थेचे अध्यक्ष शशिकांत पाटील, उपाध्यक्षा डॉ.उषा जोहरी, संचालक सागर पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यशाळा यशस्वी होण्यासाठी शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.