"सह्याद्रि"च्या चेअरमनपदी नामदार बाळासाहेब पाटील यांची व व्हाईस चेअरमनपदी सौ.लक्ष्मी गायकवाड यांची बिनविरोध निवड


"सह्याद्रि"च्या चेअरमनपदी नामदार बाळासाहेब पाटील यांची व
व्हाईस चेअरमनपदी सौ.लक्ष्मी गायकवाड यांची बिनविरोध निवड


कराड - सह्याद्रि सहकारी साखर कारखान्याची २०१९-२० ते २०२३-२४ यासालासाठीची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध पाड पडली असून, नवनिर्वाचित चेअरमनपदी सहकारमंत्री बाळासाहेब पाटील व व्हाईस चेअरमनपदी लक्ष्मी गायकवाड यांची बिनविरोध निवड करण्यात आली.


कराडचे उपनिबंधक सहकारी संस्था तथा अध्यासी अधिकारी मनोहर माळी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या नवनिर्वाचित संचालक मंडळामधून चेअरमन आणि व्हाईस चेअरमन यांच्या निवडीसाठीची सभा कारखान्याच्या मुख्य ऑफिसमधील सभागृहात पार पडली. यावेळी अध्यासी अधिकारी यांनी चेअरमन आणि व्हाईस चेअरमन निवडीसाठी दिलेल्या विहीत मुदतीमध्ये चेअरमन पदासाठी नामदार बाळासाहेब पाटील यांच्या नावाची सुचना संचालक दत्तात्रय बाबुराव जाधव यांनी मांडली, त्यास माणिकराव पाटील यांनी अनुमोदन दिले. चेअरमन पदासाठी नामदार बाळासाहेब पाटील यांचे एकमेव नामनिर्देशन पत्र दाखल झाल्यामुळे, व या पदासाठी दुसऱ्या कोणाचेही नामनिर्देशन पत्र नसल्यामुळे अध्यासी अधिकारी मनोहर माळी यांनी नामदार बाळासाहेब पाटील यांची कारखान्याच्या नवनिर्वाचित चेअरमनपदी बिनविरोध निवड झाल्याचे घोषित केले.


तद्नंतर व्हाईस चेअरमन पदासाठी लक्ष्मी संभाजीराव गायकवाड यांच्या नावाची सुचना संचालक लालासाहेब पाटील यांनी मांडली व त्यास अविनाश माने यांनी अनुमोदन दिले. व्हाईस चेअरमन पदासाठी लक्ष्मी गायकवाड यांचे एकमेव नामनिर्देशन पत्र दाखल असल्यामुळे आणि या पदासाठी दुसऱ्या कोणाचेही नामनिर्देशन पत्र न आल्यामुळे अध्यासी अधिकारी मनोहर माळी यांनी सौ.लक्ष्मी गायकवाड यांची व्हाईस चेअरमनपदी बिनविरोध निवड झाल्याचे घोषित केले.


कारखान्याच्या चेअरमन आणि व्हाईस चेअरमन यांच्या निवडीनंतर कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. नामदार बाळासाहेब पाटील यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला. या निवडीमुळे नामदार बाळासाहेब पाटील यांची कारखान्याचे चेअरमन म्हणून सलग २५ व्या वर्षाच्या कारकिर्दीची सुरूवात झाली आहे.


यावेळी बोलताना नामदार बाळासाहेब पाटील म्हणाले की, स्व.यशवंतरावजी चव्हाण आणि आदरणीय पी.डी.पाटीलसाहेब यांच्या विचाराने कारखान्याचे कामकाज सुरू असून ३७००० सभासदांच्या सहकार्यामुळे यंदा कारखान्याची निवडणूक बिनविरोध पार पडली असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.त्याबद्दल त्यांनी सर्व सभासदांचे आभार मानले.


याप्रसंगी सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सुनील माने, कराड उत्तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष देवराजदादा पाटील, सातारा जिल्हा परिषदेचे अर्थ व शिक्षण समितीचे सभापती मानसिंगराव जगदाळे, राहिमतपुरचे नगराध्यक्ष आनंदा कोरे, कराड लोकशाही आघाडीचे अध्यक्ष व माजी उपनगराध्यक्ष सुभाषराव पाटील, शिवाजी शिक्षण संस्थेचे सचिव प्रकाशबापू पाटील, अरूणकाका पाटील, कराड पंचायत समितीचे सभापती प्रणव ताटे, माजी सभापती सौ.शालन माळी, जि.प.सदस्या सौ.सुरेखा जाधव, विनीता पलंगे, धामणेरचे आदर्श सरपंच शहाजीराव क्षीरसागर, जिल्हा सहकार बोर्डाचे संचालक संजय साळुखे, लालासाहेब पवार मांडवेकर, शिवाजीराव फाळके, सुरेश पाटील बापू, रमेश चव्हाण, ॲड.मानसिंगराव पाटील, गोपाळराव धोकटे, अशोकराव पाटील-पार्लेकर, निवासराव पाटील तांबवेकर, ॲड.चंद्रकांत कदम, माजी पंचायत समिती सदस्य भाऊसाो चव्हाण, बाळासाहेब सुर्यवंशी, मार्केट कमीटीचे माजी सभापती दाजी पवार, विद्यमान सदस्य अंकुश हजारे, आदरणीय पी.डी.पाटीलसाहेब सहकारी बँकेचे संचालक सागर पाटील दादा, उमेश कदम, हिंदकेसरी संतोष वेताळ, पांडुरंग गणपती थोरात, गोविंदराव थोरात, शंकरराव पाटील, भिमराव ढमाले, गंगाधर जाधव, संभाजीराव गायकवाड, शिवाजीराव घाडगे, भरत गायकवाड, सातारा जिल्हा परिषदेचे आणि
कराड, कोरेगांव, खटाव, व सातारा पंचायत समितीचे आजी माजी पदाधिकारी, कारखान्याचे कार्यकारी संचालक आबासाहेब पाटील, सर्व अधिकारी कारखान्याचे आजी-माजी संचालक, सभासद शेतकरी संख्येने उपस्थित होते