पाटण महावितरणाचा भोंगळ कारभार

पाटण महावितरणाचा भोंगळ कारभार


कराड - मारुती शंकर पवार(पाटण) यांनी 27 डिसेंबर 2019 रोजी महावितरण ऑफिसमध्ये जाऊन वाढीव बिल आले. त्याची तक्रार केली होती. पण आजअखेर अधिकाऱ्यांनी दखल घेतलेली नाही. भरमसाठ वाढीव बिलाचे तक्रार करून देखील वाढीव बिल दुरुस्त करून दिलेले नाही.


वाढीव बिल दुरुस्त करून देतो असे आश्वासन दिले होते, परंतु आश्वासन महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी पुर्ण केले नाही. बीलावरील चालू रीडिंग 2737 असे आहे व मागील चालू रीडिंग 2737 असे आहे. मग युनिट 160 कसे दाखविले ? याचा खुलासा महावितरण कंपनीचे अधिकारी करीत नाहीत. महावितरण कंपनीच्या कारभाराचा सर्वसामान्य नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो आहे. सध्या आर्थिक मंदी असून वीजबिल एक महिन्याचे येत आहे. प्रति महिना येणारे लाईट बिल जादा येत असल्याची तक्रार करूनही याबाबत समाधानकारक खुलासा केला जात नाही. 


विज बिल अधिक येत असल्यामुळे अधिकाऱ्यांना विचारले तर महावितरणचे अधिकारी सांगतात, स्थिर आकार जास्त आहे. त्यामुळे बिल जादा येत आहे. दरम्यान वायरमन रीडिंग घेण्यासाठी येतात, त्यांना रीडिंग संबंधाने विचारले असता ते मनाला येईल तसे बोलतात. त्यामुळे ग्राहक व वायरमन यांच्यामध्ये वाद-विवाद होत आहेत. प्रत्येक महिन्याला वीजबिल वाढवून येत आहे. मागील रिडींग व चालू रीडिंग यामध्ये तफावत दिसून येते. मंदीचे वातावरण असताना व्यवसाय चालविणे कठीण झाले आहे. यामध्ये भर म्हणजे वायरमेन व्यवसायाच्या ठिकाणी येऊन लाईट बिल भरा, असा सातत्याने तगादा लावत असतात. विज बिल भरले नाही तर लाईट कनेक्शन बंद केले जाईल असा दम भरत असल्याच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत.