शिवरात्र


शिवरात्र


शिव ही सहज प्रसन्न होणारी देवता असल्यामुळे शिवाचे भक्त पृथ्वीतलावर मोठ्या प्रमाणात आहेतमहाशिवरात्र हे शिवाचे व्रत असून या व्रताचे महत्त्वव्रत करण्याची पद्धत आणि महाशिवरात्र व्रताचा विधी यांविषयीची माहिती खालील लेखातून जाणून घेऊया.


महाशिवरात्र हे व्रत माघ वद्य चतुर्दशी या तिथीला करतातमहाशिवरात्र हे शिवाचे व्रत आहे. महाशिवरात्र या दिवशी शिवतत्त्व नेहमीपेक्षा १००० पटीने कार्यरत असतेशिवतत्त्वाचा अधिकाधिक लाभ मिळण्यासाठी महाशिवरात्रीला शिवाची भावपूर्णरित्या पूजाअर्चा करण्यासह ‘ॐ नमः शिवाय ।’ हा नामजप जास्तीतजास्त करावा.उपवासपूजा आणि जागरण ही महाशिवरात्र व्रताची तीन अंगे आहेत.


महाशिवरात्र व्रताचा विधी माघ कृष्ण त्रयोदशीला एकभुक्त रहावेचतुर्दशीच्या दिवशी सकाळी महाशिवरात्र व्रताचा संकल्प करावासायंकाळी नदीवर किंवा तळ्यावर जाऊन शास्त्रोक्त स्नान करावेभस्म आणि रुद्राक्ष धारण करावेप्रदोषकाळी शिवाच्या देवळात जावेशिवाचे ध्यान करावेमग षोडशोपचारे पूजा करावीभवभवानीप्रीत्यर्थ तर्पण करावेशिवाला एकशे आठ कमळे किंवा बेलाची पाने नाममंत्राने वाहावीतमग पुष्पांजली अर्पण करून अर्घ्य द्यावेपूजासमर्पणस्तोत्रपाठ आणि मूलमंत्राचा जप झाल्यावर शिवाच्या मस्तकावरील एक फूल काढून ते स्वतःच्या मस्तकावर ठेवावे आणि क्षमायाचना करावी.


 यामपूजा शिवरात्रीला रात्रीच्या चार प्रहरी चार पूजा कराव्यातअसे विधान आहेत्यांना ‘यामपूजा’ असे म्हणतातप्रत्येक यामपूजेत देवाला अभ्यंगस्नान घालावेअनुलेपन करावेतसेच धोत्राआंबा आणि बेल यांची पत्री वाहावीतांदुळाच्या पिठाचे २६ दिवे करून त्यांनी देवाला ओवाळावेपूजेच्या शेवटी १०८ दिवे दान द्यावेतप्रत्येक पूजेतील मंत्र वेगवेगळे असतातत्यांनी अर्घ्य द्यावेनृत्यगीतकथाश्रवण इत्यादी गोष्टींनी जागरण करावेपहाटे स्नान करून पुनश्च शिवपूजा करावीपारण्याला ब्राह्मणभोजन घालावेआशीर्वाद घेऊन व्रतसमाप्ती करावीबाराचौदा किंवा चोवीस वर्षे हे व्रत केल्यावर त्याचे उद्यापन करावे.’


भगवान शंकर रात्रीच्या एका प्रहरी विश्रांती घेतोत्या प्रहरालाम्हणजे शंकराच्या विश्रांती घेण्याच्या काळाला महाशिवरात्र असे म्हणतातपृथ्वीवरील एक वर्ष म्हणजे स्वर्गलोकातील एक दिवसपृथ्वी जड (स्थूलआहेजडाची गती खूप कमी असतेम्हणजेच जडाला ब्रह्मांडात प्रवास करण्यास जास्त वेळ लागतोदेवता सूक्ष्म असल्याने त्यांची गती जास्त असतेत्यामुळे त्यांना ब्रह्मांडात प्रवास करण्यास कमी वेळ लागतोयामुळेच पृथ्वी अन् देवता यांच्यामध्ये एक वर्षाचे अंतर आहे.


महाशिवरात्रीला उपासना केल्याने होणारा लाभ


भगवानशंकर रात्रीच्या एका प्रहरी विश्रांती घेतोत्या प्रहरालाम्हणजे शंकराच्या विश्रांती घेण्याच्या काळाला `महाशिवरात्रअसे म्हणतातमहाशिवरात्रीच्या दिवशी शिवाची उपासना करण्यामागील शास्त्र याप्रमाणे आहे. `शिवाच्या विश्रांतीच्या वेळी शिवतत्त्वाचे कार्य थांबतेम्हणजेच त्या वेळी शिव ध्यानावस्थेतून समाधी-अवस्थेमध्ये जातोशिवाची समाधी-अवस्था म्हणजे शिवाने स्वत:साठी साधना करण्याचा काळत्यामुळे विश्वातील किंवा ब्रह्मांडातील तमोगुण किंवा हालाहल त्यावेळी शिवतत्त्व स्वीकारत नाहीत्यामुळे ब्रह्मांडामध्ये हालाहलाचे प्रमाण प्रचंड वाढते त्याचा परिणाम आपल्यावर होऊ नये म्हणून जास्तीतजास्त शिवतत्त्व आकृष्ट करणारी बिल्वपत्रेपांढरी फुलेरुद्राक्षांच्या माळा इत्यादी शिवपिंडीवर अर्पण करून वातावरणातील शिवतत्त्व आकृष्ट केले जातेत्यामुळे वाईट शक्तींच्या वाढलेल्या दाबाचा परिणाम आपल्याला म्हणावा तितका जाणवत नाही.' 


शिवाने स्वतभक्तांना आशीर्वचन दिले आहे, ‘जे महाशिवरात्रीला माझे व्रत करतीलत्यांच्यावर माझी पुढीलप्रमाणे कृपादृष्टी होईल -  पुरुषांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील,  कुमारिकांना मनासारखा वर मिळेल, विवाहित स्त्रियांचे सौभाग्य टिकेल. `महाशिवरात्रीच्या दिवशी शिव सर्व जिवांना आवर्जून मार्गदर्शन करतोत्यामुळे अनेक जीव त्याच्याकडून मार्गदर्शन घेण्यासाठी त्या दिवशी शिवलोकात उपस्थित असतात.'Popular posts
"बंडातात्या"लाही संपवायचे होते, पंढरपूर हत्याकांडातील आरोपी बाजीराव बुवा कराडकराची खळबळजनक कबुली
Image
अशासकीय पदावरील नियुक्त्या रद्द ......महाराष्ट्र राज्य सहकारी परिषद, राज्यस्तरीय लेखा समिती, राज्य कृषि मूल्य आयोग
Image
मातंग समाजाच्या उन्नतीसाठी काम करणार ....लहुजी शक्तीसेना कराड शहराध्यक्षपदी सुरज घोलप यांची निवड
Image
"काँग्रेस"ला गतवैभव प्राप्तसाठी पृथ्वीराजबाबा - विलासकाका यांच्यात सकारात्मक चर्चा : राज्यमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील
Image
विशेष मुलाखत : पुणे आयुक्त दीपक म्हैसेकर सर्वांच्या सहकार्याने कोरोनावर निश्चितपणे मात करता येईल...
Image