आदिती तटकरे यांच्याकडे विधी व न्याय विभागाच्या राज्यमंत्री पदाचा कार्यभार
मुंबई - राज्यपालांच्या आदेशानुसार विधी व न्याय विभागाच्या राज्यमंत्री पदाचा कार्यभार कुमारी आदिती तटकरे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.
यापूर्वी राज्यमंत्री आदिती तटकरे यांच्याकडे उद्योग खनिकर्म, पर्यटन, क्रीडा, युवक कल्याण, फलोत्पादन, माहिती व जनसंपर्क, राजशिष्टाचार या विभागाच्या राज्यमंत्री पदाचा कार्यभार सोपविण्यात आला होता.
विधी व न्याय विभागाचा कार्यभार राज्यमंत्री म्हणून कुमारी तटकरे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. त्यानुसार विधी व न्याय विभागाशी सबंधित विधान मंडळाचे सर्व कामकाज यापुढे कुमारी तटकरे यांनी पाहावे असेही मुख्यमंत्री कार्यालयाकडून<span style="font-size:12pt;font-family: