आत्मविश्वासाने विद्यार्थ्यांनी परीक्षेस सामोरे जावे - जशराज पाटील 


आत्मविश्वासाने विद्यार्थ्यांनी परीक्षेस सामोरे जावे - जशराज पाटील 


कराड - शालेय शिक्षण घेत असताना कोणत्याही प्रकारची भीती न बाळगता तसेच मानसिक त्रास होणार नाही याची काळजी घेऊन आत्मविश्वासाने परीक्षेस सामोरे जावे असे प्रतिपादन कराड उत्तरचे युवा नेते, सह्याद्रि सहकारी साखर कारखान्याचे संचालक मा.जशराज पाटील यांनी केले.


करवडी (ता.कराड) येथे  महाराष्ट्र राज्याचे सहकार व पणनमंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार  बाळासाहेब पाटील  यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी या शिक्षण संस्थेच्या न्यु इंग्लिश स्कुल या माध्यमिक विद्यालयाच्या प्रांगणामध्ये एस.एस.सी.बॅच २०१९-२०२० विद्यार्थी शुभचिंतन आणि पारितोषिक वितरण समारंभ प्रसंगी ते बोलत होते.


या प्रसंगी विद्यालयाच्या वतीने सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या संचालकपदी मा.जशराज पाटील (बाबा) यांची बिनविरोध निवड झाली या बद्दल मा.बाबांचा सत्कार करण्यात आला तसेच यावेळी सन२०१८-१९ बॅचच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा, ८ वी ते  १० वी मधील विविध स्पर्धांमध्ये, यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्याचा सन्मान प्रमुख पाहुणे व मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आला.या वर्षीच्या विद्यार्थ्यांनी विद्यालयास भेट दिलेल्या वस्तूंचा स्विकार करण्यात आला.


प्रसंगी सह्याद्री कारखान्याचे संचालक व संस्थेचे चेअरमन मा. लालासाहेब पाटील, सह्याद्री कारखान्याचे चीफ अकाऊंटंट मा.जी.व्ही.पिसाळसाहेब, सचिव व्ही.एम.पोळ, करवडी गावच्या सरपंच सौ.लतिका पिसाळ, उत्तमराव पिसाळ (बापू), नारायण पिसाळ, अमित डूबल, नानासो पवार, डॉ विनोद मोरे, अमोल पिसाळ, चंद्रकांत डुबल, सर्जेराव डूबल अशोकराव पिसाळ, सुनिल पिसाळ, अनिल पवार लालासाहेब गोडसे, साहेबराव पिसाळ, आकाश पिसाळ, विक्रम पिसाळ, संभाजी चव्हाण (सर), विद्यालयाचे मुख्याद्यापक थोरात सर,  शिक्षक,शिक्षिका, सेवक वर्ग आजी माजी विद्यार्थी, पालक बंधू-भगिनी बहुसंख्येने उपस्थित होते .