प्रवीण पवारला कुस्तीत सुवर्ण पदक


प्रवीण पवारला कुस्तीत सुवर्ण पदक

 

कराड, (प्रतिनिधी) - गोंदी (ता. कराड)येथील प्रवीण जयवंत पवार याने राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावले आहे. बालेवाडी (पुणे) येथील छत्रपती शिवाजी महाराज क्रिडा संकुलात सँबो फेडरेशन ऑफ इंडियाने घेतलेल्या 10 व्या राष्ट्रीय सँबो चॅम्पियनशिप स्पर्धेत प्रवीणने हे सुवर्ण पदक पटकावले आहे.

 

या स्पर्धेमधून त्याची रशिया येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. 82 किलो वजनगटात त्याने हे यश मिळवले आहे. सध्या तो पुणे (कात्रज) येथील मामासाहेब मोहोळ कुस्ती संकुल येथे सराव करत आहे. त्याला  ज्ञानेश्वर मांगडे, आबाजी माने, अमरसिंह सासणे, वडील पैलवान जयवंत पवार यांचे मार्गदर्शन मिळत आहे. तो गावचे दीर्घकाळ ग्रामपंचायत सदस्य म्हणून कार्यभार सांभाळलेले (कै.) दिनकर लक्ष्मण पवार (पंच) यांचा नातू आहे.

 

 या यशाबद्दल उपमहाराष्ट्र केसरी पैलवान तानाजी खरात, पैलवान जगन्नाथ उर्फ नथुराम पवार, उपसरपंच किशोर पवार, कृष्णा कृषी उद्योग संघाचे उपाध्यक्ष संदीप यादव, भाऊसाहेब पवार, पैलवान सचिन पवार, दिग्विजय पवार, बाळासाहेब संपत पवार, विकास जाधव यांच्यासह नेहरू युवा गणेश मंडळ व नरवीर उमाजी नाईक गणेश मंडळाचे कार्यकर्ते, विविध संस्थांचे पदाधिकारी व ग्रामस्थांनी अभिनंदन केले आहे.