नगराध्यक्षांच्या केबिनला कुलूप लावणे पडले महागात; गुन्हा झाला दाखल... फीर्याद व गुन्हा दाखल झालेली कलम

 


नगराध्यक्षांच्या केबिनला कुलूप लावणे पडले महागात; गुन्हा झाला दाखल... फीर्याद व गुन्हा दाखल झालेली कलम


मी, श्रीपाद भाऊसो देशपांडे वय-51वर्षे ,व्यावसाय-नोकरी (कराड नगरपरीषद कराड) रा. सोमवार पेठ, कराड ता.कराड जि.सातारा मो.नं.9420406409. समक्ष कराड शहर पोलीस  ठाणेतह राहून सांगतो खबरी जबाब की,मी वरील नमुद ठिकाणी सुमारे 24 वर्षापासन नोकरीत करीत आहे.सध्या मी मा.नगराध्यक्ष कराड नगरपरीषद कराड याचे स्वीय सहाय्यक या पदावर काम करीत आहे. आज दिनांक 25/02/2020 रोजी कार्यालयीन वेळेमध्ये कामकाज करत असताना सकाळी 11.30 वांजनेचे सुमारास प्रहार संघटनेचे श्री.सतीश पाटील व इतर तीन अनोळखी कार्यकर्ते केबिन जवळ आले व नगराध्यक्षा सौ.रोहिणी उमेश शिंदे कुठे आहेत, आम्हाला तक्रार द्यायची आहे, असे सांगितले. त्यावेळी मी त्यांना नगराध्यक्षा सौ .मा.रोहिणी उमेश शिंदे पक्षाच्या कार्यक्रमासाठी बाहेर आहेत, तुमची तक्रार असेल तर माझ्याकडे द्या. अशी विनंती केली. असता त्यांनी आम्हाला नगराध्यक्षा यांनाच भेटावयाचे आहे. लोकांनी त्यांची कामे करण्यासाठी त्याना निवडन दिले आहे पक्षाच्या कार्यक्रमासाठी नाही असे बोलण्यास सुरुवात केली.


त्यावेळी मी परत त्यांना विनंती केली की, पुर्व नियोजित कार्यक्रमामुळे नगराध्यक्षा बाहेर आहेत, आपणास वाटत असेल तर ज्या ठिकाणी तो कार्यक्रम चालू आहे, तेथे जाऊन नगराध्यक्षांची भेट घेऊन सबंधित कार्यकामातून नगराध्यक्षाना मी बाजूला बोलावितो आपण त्यांच्याशी चर्चा करा, अशी विनंती केली. असता नगराध्यक्षा 11वाजता नगरपालिकेत हजर पाहिजे, हि त्यांच्या कामाची पध्दत बरोबर नाही. 5मिनिटे वाट बघेन नाहीतर केबिनला कुलूप लावणार आहे. अशी धमकी त्यांनी देऊन त्यांच्या सोबत आलेल्या अनोळखी कार्यालयास कुलूप घेऊन ये, असे सांगितले. हि सर्व परिस्थिती सांगण्यासाठी मी श्री.ए.आर.पवार साहेब यांना सांगण्यासाठी त्यांच्या केबिनमध्ये गेलो व पवार साहेबांना वरील परिस्थिती सांगून परत येईपर्यत श्री.सतिश पाटील व त्यांचेसोबत अनोळखीचे तीन कार्यकर्ते यांनी नगराध्यक्षांच्या केबिनला कुलूप घालून ते निघून गेले होते.


यावेळी आमचा एक शिपाई कर्मचारी श्री.यशवंत महादेव साळुखे केबिनमध्ये अडकला होता.त्यामुळे आमचे सरकारी कामकाज करणेस, सतिश पाटील व त्यांचेसोबत असलेले अनोळखी तीन इसमांनी अडथळा निर्माण केला.याबाबत आम्ही मा.मुख्याधिकाऱ्यांच्या मार्फत सदरची तक्रार कराड शहर पोलीस ठाणेस फोनद्वारे कळविलेवरुन पोलीस आले व सतिश पाटील व त्यांचे त्यांचेसोबत असलेले अनोळखी तीन कार्यकर्ते यांनी लावलेले नगराध्यक्ष केबीनचे कुलूप पंचमाना करुन काढून रितसर आमचे सरकारी कामकाजातील अडथळा दूर केला. तरी दिनाक 25/02/2020रोजी सकाळी 11.30वा.चे सुमारास कराड नगरपरिषद कराड कार्यालयातील मा.नगराध्यक्षा सौ.रोहिणी उमेश शिंदे यांचे केबिन समोर प्रहार संघटनेचे श्री.सतीश पाटील व इतर तीन अनोळखी कार्यकर्ते केबिन जवळ आले व नगराध्यक्षा सौ.रोहिणी उमेश शिदे कुठे आहेत आम्हाला तक्रार द्यायची आहे असे म्हणालेवरुन नगराध्यक्षा बाहेर आहेत असे समजून सांगता असता आमचे काहीएक न ऐकता कोणतीही पुवकल्पना न देतो नगराध्यक्ष केबीनचे दरवाजाला कुलूप लावून आमचा एक शिपाई कर्मचारी श्री.यशवंत महादेव साळुखे केबिनमध्ये अडकवून ठेवला. व आम्ही करीत असलेल्या सरकारी कामकाज करणेस सतिश पाटील व त्यांचेसोबत असले अनोळखी तीन कार्यकर्ते यांनी अडथळा निर्माण केला. म्हणून माझी त्यांचे विरुध्द सरकारतर्फे फिर्याद आहे. माझा वरील संगणकावर टंकलिखित केलेला खबरी जबाब मी वाचून पाहिला. तो माझे सांगणेप्रमाणे बरोबर टंकलिखित केला आहे.


सतीश पाटील व इतर 3 यांचेवर Ipc 353,342,186 नुसार
कराड शहर पोलिसात गुन्हे दाखल
353 सरकारी कामकाजात अडथळे आणणे,
186 सरकारी कर्मचारी यांच्यावर हल्ला करणे,
342 सरकारी कर्मचारी याला कोंडणे,
34 संगनमत.
फिर्याद........


Popular posts
अशासकीय पदावरील नियुक्त्या रद्द ......महाराष्ट्र राज्य सहकारी परिषद, राज्यस्तरीय लेखा समिती, राज्य कृषि मूल्य आयोग
Image
राज्य शासनामार्फत पत्रकारांसाठी गृह योजना राबवून घरे उपलब्ध करून द्यावीत : जेष्ठ पत्रकार आप्पासाहेब पाटील
Image
कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी कोणाला नको आहेत ! मुख्याधिकारी यशवंत डांगे यांना हटविण्याचा प्रयत्न सुरू
Image
प्रदेश युवक काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी शिवराज मोरे यांची निवड
Image
महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी 1 हजार 306 कोटी निधी वितरीत करण्यास मान्यता..सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांची माहिती
Image