राहुल पवार यांचा जिल्हा युवा पुरस्काराने गौरव


राहुल पवार यांचा जिल्हा युवा पुरस्काराने गौरव


कराड - नेहरू युवा केंद्राचा युवा गौरव पुरस्कार राहूल पवार यांना प्रदान समारंभ पूर्वक प्रधान करण्यात आला.सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणार्या युवकांना 'युवा गौरव पुरस्कार ' देऊन सन्मानित केले जाते.


राहूल पवार, रा.वडोली निळेश्वर(ता.कराड) यांनी नदी बचाओ पर्यावरण चळवळ, किशोर विकास हेल्थ प्रोग्रॅम,मराठी आणि कोकणी भाषा संवर्धनासाठी केलेले विविध उपक्रम, काँलेजमधील चर्चासत्रे या विविध माध्यमातून तळमळीने व निरपेक्ष वृत्तीने समाजकार्य केले आहे. या सर्व कार्याची दखल घेऊन युवा केंद्राचा युवा गौरव पुरस्कार राहूल पवार यांना या पुरस्काराने सन्मानित केले आहे.


निरपेक्ष भावनेने आतापर्यंत केलेल्या कामाची दखल घेऊन माझा गौरव करण्यात आला याबद्दल मला आनंद होत आहे अशी प्रतिक्रिया राहुल पवार यांनी व्यक्त केली.या पुरस्काराने सामाजिक काम करण्याचे बळ अधिक वाढले असून यापुढच्या काळातही अधिक जोमाने काम करण्यात येईल, अशी ग्वाहीही राहुल पवार यांनी दिले आहे.


या कार्यक्रमासाठी उद्योजक श्री राकेश भाटिया, पोलिस उपनिरीक्षक श्री राजेंद्र यादव, जिल्हा युवा समन्वयक कालिदास घाटवळ साहेब, जी.प.सदस्या सौ.अर्चना देशमुख, भानुदास यादव आदि मान्यवर उपस्थित होते . या पुरस्काराबद्दल राहुल पवार यांचे सामाजिक क्षेत्रासह विविध क्षेत्रातूनही अभिनंदन करण्यात येत आहे.


Popular posts
अशासकीय पदावरील नियुक्त्या रद्द ......महाराष्ट्र राज्य सहकारी परिषद, राज्यस्तरीय लेखा समिती, राज्य कृषि मूल्य आयोग
Image
राज्य शासनामार्फत पत्रकारांसाठी गृह योजना राबवून घरे उपलब्ध करून द्यावीत : जेष्ठ पत्रकार आप्पासाहेब पाटील
Image
कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी कोणाला नको आहेत ! मुख्याधिकारी यशवंत डांगे यांना हटविण्याचा प्रयत्न सुरू
Image
प्रदेश युवक काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी शिवराज मोरे यांची निवड
Image
महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी 1 हजार 306 कोटी निधी वितरीत करण्यास मान्यता..सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांची माहिती
Image