व्हायब्रण्ट एच. आर. (पुणे) यांचा पाचवा वर्धापन दिवस साजरा....ज्वलंत सामाजिक पर्यावरणावर कार्य करावे - माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण


 व्हायब्रण्ट एच. आर. (पुणे) यांचा पाचवा वर्धापन दिवस साजरा....ज्वलंत सामाजिक पर्यावरणावर कार्य करावे - माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण 


पुणे - औद्योगिक क्षेत्रातील चालू घडामोडी त्यातील अडचणी आणि त्यामध्ये एच.आर.ची भूमिका समर्पकपणे मांडली.  याचबरोबर व्हायब्रण्ट एच.आरने स्वतःचे कार्य मानवी संसाधन क्षेत्रापुरते मर्यादित न ठेवता ज्वलंत सामाजिक पर्यावरण या सारख्या विषयांवर भरीव कार्य केले असल्याचे गौरवोद्गार माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.


व्हायब्रण्ट एच आर  ही औद्योगिक क्षेत्रात मानव संसाधन आणि प्रशासन विभागात कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांची संघटनेचा पाचवा वर्धापन दिवस साजरा करण्यात आला. सामाजिक कार्य केलेबद्दल श्रीगौरी सावंत, लक्ष्मी अगरवाल,डॉ दिव्या गुप्ता, सतीश घोगरे, आशिष गकरे, सुरेश कार्की, केतन कपूर यांना पुरस्कार प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रदान करण्यांत आले.


अप्पर कामगार आयुक्त पुणे व कामगार उपायुक्त आणि बागल काकडे असोसिएट यांचे वतीने व्हायब्रण्ट एच आर व सानिया शंकर साळुंखे, शीतल विकास साळुंके आणि शंकर जगन्नाथ साळुंखे यांना पुणे ते कन्याकुमारी सायकल प्रवास करून बाल कामगार प्रथा निर्मूलन व इतर सामाजिक आणि पर्यावरणा विषयी प्रचार प्रसार माध्यमातून जनजागृती केलेबद्दल विशेष सन्मानपत्र पृथ्वीराज चव्हाण यांचे हस्ते प्रदान करण्यात आले.


हरीश साईरामन यांचे मास्टरींग रिलेशनशिप या  विषयावर व्याख्यान झाले. संदीप जगताप, ह्रिषीकेश, कौस्तुभ, ऋग्वेद आणि मोहित यांचे शास्रीय संगीताच्या जुगलबंदीने झाली.अप्पर कामगार आयुक्त शैलेंद्र पोळ, कामगार उपायुक्त विकास पनवेलकर, व्हायब्रण्ट एच आरचे प्रमुख सल्लागार श्रीनिवास इनामती, माजी कामगार उपायुक्त संभाजी काकडे, विजय जगताप, संग्राम पवार उपस्थित होते. कार्यक्रमास पुणे, सातारा, सांगली, संभाजीनगर, नगर, कोल्हापूर, सांगली, मुंबई, रायगड, ठाणे, बेंगलोर नोएडा, गोवा, अहमदाबाद येथील ४७० हुन अधिक मानवी संसाधन अधिकारी उपस्थित होते. Popular posts
सेवा सोसायटीनी उद्योगाला कर्ज दिले तर प्रत्येक गाव सक्षम होईल 
Image
‘कृष्णा’च्या रोगनिदान प्रयोगशाळेला ‘कोविड-19’च्या टेस्ट करण्यास मान्यता....आता कराडमध्येच होणार कोरोना चाचणी; सातारा जिल्यातील एकमेव प्रयोगशाळा
Image
मुख्याधिकारी यशवंत डांगे यांनी हद्दीवर रोखलेला कोरोना अखेर कराडमध्ये दाखल झाला....वैद्यकीय अधीक्षक प्रकाश शिंदे यांच्यावर कारवाई करावी...कोविड कक्ष उपजिल्हा रुग्णालयाऐवजी सह्याद्री हॉस्पिटलला हलवण्याची मागणी
वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित २१ हजार व्यक्तींचे कोरोना लढ्यात सहभागी होण्यासाठी अर्ज...सबंधित जिल्ह्यांमध्ये नियुक्त्या देणार 
राज्यातील पालखी सोहळा प्रमुखांच्या समन्वय समितीची बुधवारी बैठक....आषाढीवारी बाबत होणार निर्णय
Image