महिलादिनीच हातगाडे चालक महिलांचा भीक मागो आंदोलन.....हॉकर्स झोनचा प्रश्न चिघळण्याची शक्यता

 


महिलादिनीच हातगाडे चालक महिलांचा भीक मागो आंदोलन.....हॉकर्स झोनचा प्रश्न चिघळण्याची शक्यता


कराड - हॉकर्स झोनसाठी हातागाडाधारक आक्रमक झाले असून महिला दिना दिवशीच महिला विक्रेत्यांनी शहरात हॉकर्स झोन होत नसल्याच्या निषेधार्थ भिक मांगो आंदोलन केले. आंदाेलक महिलांनी माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या घरी जावून भिक मागीतली. त्याशिवाय हॉकर्स झोन व्हावा, यासाठी लक्ष घालण्याची विनंती केली. पृथ्वीराजबाबांचे पुतणे इंद्रजीत चव्हाण, स्वीय सहायक गजानन आवळकर यांच्याशी चर्चा केली. हातगाडीधारकांनी त्यांना निवेदनही दिले.


दरम्यान अतिक्रमण मोहिमेमध्ये एसटी स्टँड परिसरासह संपूर्ण कराड शहरातील हातगाडे हटवण्यात आले आहेत. हॉकर्स झोन जाहीर करून नगरपालिकेने हातगाडे चालकांचे पुनर्वसन करणे आवश्यक आहे. एसटी स्टँड समोरील पार्किंगसाठी आरक्षित असलेली जागा आणि नवग्रह मंदिराच्या परिसरातील एसटी स्टँड भिंतीलगत तात्पुरते हातगाडे चालकांना देण्यात यावी अशी मागणी होत असून याला नगरपालिका प्रशासकीय अधिकारी अनुकूल आहेत तर कराड नगरपालिकेचे नगरसेवक इच्छुक नसल्याचे बोलले जात आहे.


कराडमध्ये अतिक्रमण हटाव मोहिमे सुरू झाल्यापासून बारा दिवस व्यवसाय बंद आहे. चरितार्थाचा प्रश्न निर्माण झाला असून नगरपालिका हॉकर्स झोनबाबत निर्णय घेत नसल्याचा निषेध फळविक्रेत्या महिलांनी भिक मागून आंदोलन केले. असे हातगाडा धारक संघटनचे अध्यक्ष जावेद नायकवडी यांनी सांगितले. हातगाडा धारकांनी नगरपालिका पदाधिकाऱ्यांनी भेट घेतली. व्यवसाय बंद आहे, त्यामुळे रोजी रोटीचा प्रश्न निर्माण झाल्याची व्यथा मांडली. हातगाडे लावत नाही, मात्र झोन करा अशी मागणी केली आहे. जागेचा प्रश्न सुटत नाही. तोपर्यंत हातगाडेधारक आहे त्याठिकाणी हातगाडे परवानगी दयावी अशी मागणी करू लागले आहेत.


नगराध्यक्ष रोहिणी शिंदे, गट नेते राजेंद्र यादव, ज्येष्ठ विनायक पावसकर, विरोधी पक्षनेते सौरभ पाटील, नियोजन सभापती विजय वाटेगावकर, महिला व बालकल्याण सभापती स्मिता हुलवान, शारदा जाधव, नगरसेविका अंजली कुंभार, पाणीपुरवठा व जलनिस्सारण समितीच्या सभापती आशा मुळे यांच्यासबोत हॉकर्स झोनच्या पदाधिकाऱ्यांनी चर्चा केली आहे. संघटनेचे अध्यक्ष जावेद नायकवडी, सतिश तावरे, हरिश बल्लाळ, गजानन कुंभार, आशपाक मुल्ला, रमेश सावंत यांच्यासह सर्वच हात गाडी चालक आमच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न त्वरित सोडवावा अशी मागणी करीत आहेत.