मातंग समाजाच्या उन्नतीसाठी काम करणार ....लहुजी शक्तीसेना कराड शहराध्यक्षपदी सुरज घोलप यांची निवड


मातंग समाजाच्या उन्नतीसाठी काम करणार ....लहुजी शक्तीसेना कराड शहराध्यक्षपदी सुरज घोलप यांची निवड


कराड  मातंग समाजातील दिन दुबळ्यांना आणि लोकांना न्याय देण्यासाठी काम करणार असून लहुजी शक्तीसेनेची मोठ्या ताकतीने कराड शहरात बांधणी करणार आहे. मातंग समाज आज दुर्लक्षित आहे, मातंग समाजाला सर्वस्तरात न्याय मिळाला पाहिजे, मातंग समाजाची उन्नती झाली पाहिजे, ही भूमिका घेऊन काम करणार असल्याचे सुरज घोलप यांनी निवडीनंतर मत व्यक्त केले. 


महाराष्ट्र राज्य लहुजी शक्तीसेना कराड शहराध्यक्षपदी सुरज घोलप यांची निवड करण्यात आली आहे. या निवडीनंतर सुरज घोलप यांचे विविध स्तरातून अभिनंदन होत आहे.यावेळी संस्थापक अध्यक्ष विष्णू कसबे, राज्याध्यक्ष युवराज जाधव, जिल्हा अध्यक्ष चंद्रकांत अवघडे, सातारा-सांगली जिल्हा संपर्कप्रमुख किशोर खुडे, सांगली जिल्हा अध्यक्ष कुलदिप कांबळे, कराड तालुका अध्यक्ष संग्राम सकट, आकाश मिसाळ यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.


Popular posts
अशासकीय पदावरील नियुक्त्या रद्द ......महाराष्ट्र राज्य सहकारी परिषद, राज्यस्तरीय लेखा समिती, राज्य कृषि मूल्य आयोग
Image
कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी कोणाला नको आहेत ! मुख्याधिकारी यशवंत डांगे यांना हटविण्याचा प्रयत्न सुरू
Image
कृष्णा हॉस्पिटल, डॉ. सुरेश भोसले, अतुल भोसले यांची बदनामी करणारे यांच्या विरोधात गुन्हा दाखल....भामट्याचे नाव उघड करा पत्रकारांची मागणी 
Image
हणबरवाडी - धनगरवाडी योजनेचा पहिला टप्पा मार्च - २०२१ पर्यंत कार्यान्वित होणार...किवळ व खोडजाईवाडीचा प्रस्ताव द्यावा
Image
स्वखर्चानी शिवभक्तांनी केला शंभू महादेव मंदिराचा जीर्णोद्धार
Image