गृहराज्यमंत्र्यांच्या एका फोनमुळे “ तिला ” सुखरुप घरी पोहचता आले.....ना.शंभूराज देसाईंच्या फोनमुळे चुकलेली मुलगी तिच्या कुटुंबात सुखरुप


गृहराज्यमंत्र्यांच्या एका फोनमुळे “ तिला ” सुखरुप घरी पोहचता आले.....ना.शंभूराज देसाईंच्या फोनमुळे चुकलेली मुलगी तिच्या कुटुंबात सुखरुप


कराड - कोरोना आजारापासून सुरक्षा मिळणेकरीता मुंबई, पुणे शहरातून आपआपल्या गांवी मिळेल त्या वाहनांने पोहचण्याचे अनेकांचे प्रयत्न सुरु आहेत.आपल्या सुरक्षितेकरीता असाच मिळेल त्या वाहनांने घरी पोहचण्याचा प्रयत्न सातारा जिल्हयातील पाटण तालुक्यातील एका २२ वर्षीय मुलीने केला आणि गांवी पोहचण्याएैवजी चुकुन ती पोहचली सोलापुर जिल्हयामध्ये.२१ दिवसाच्या लॉकडाऊनमुळे सगळीकडे बंद असल्या मुळे आता घरी पोहचायचे कसे ? असा प्रश्न पडलेल्या त्या मुलीने थेट राज्याचे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनाच फोन लावला आणि आपली हकीकत सांगून मला माझे गांवी नेण्याची व्यवस्था करा अशी विनंती केली.


ना.शंभूराज देसाईंनी विलंब न लावता तात्काळ सोलापुर जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांना फोन लावला आणि त्या मुलीला तिच्या घरी आणणेकरीता तिचे कुंटुंबातील व्यक्तीला सोलापुरला पाठवित आहे तिला सुखरुप तिच्या कुटुंबाच्या ताब्यात दयावे असे सुचित केले.गृहराज्यमंत्र्यांच्याएका फोनमुळे तातडीने या हालचाली झाल्याने ती मुलगी एवढया कठीण परिस्थितीत तिच्या लुगडेवाडी ता.पाटण या गांवी तिच्या कुटुंबामध्ये सुखरुप पोहचली आहे.



महाराष्ट्र राज्यामध्ये कोरोना विषाणूने अक्षरश: तैमान घातले असून राज्यामध्ये दिवसेंदिवस कोरोना बाधित व्यक्तींमध्ये वाढच होत आहे. नोकरीनिमित्त, कामानिमित्त,रोजगारानिमित्त ग्रामीण भागातील अनेक नागरिक आपल्या कुटुंबासह मुंबई, पुणे शहरामध्ये वास्तव्यास आहेत तर अनेक उच्चशिक्षीत मुले-मुली मुंबई,पुणे शहरामधील मोठमोठया कंपन्यामध्ये नोकरी करीत आहेत.कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ होत असल्याने आपल्या सुरक्षितते करीता मुंबई,पुणे शहरातून बाहेर पडून आपल्या गांवाकडे जाण्याकरीता या सर्वांची धडपड सुरु आहे. २१ दिवसाच्या लॉकडाऊनमुळे सर्वंत्र संचारबंदी,जमावबंदी असल्यामुळे वाहने बंद करण्यात आली आहेत.


अत्यावश्यक सेवांच्या वाहनामधून मिळेल तसे आपआपल्या घरी पोहचण्याचा प्रयत्न करणाऱ्यामध्ये मुंबई येथे नोकरीनिमित्त असणाऱ्या सातारा जिल्हयातील पाटण तालुक्यातील लुगडेवाडी येथील एक २२ वर्षीय मुलगी तिच्या सुरक्षेकरीता मुंबईहून मिळेल त्या वाहनांने लुगडेवाडी या सातारा जिल्हयातील पाटण तालुक्यातील गांवाकडे येण्यास निघाली परंतू घाईगडबडीत मिळेल त्या वाहनात बसल्यामुळे ती गावाकडे पोहचण्याएैवजी ती पोहचली सोलापुर जिल्हयातील सांगोला तालुक्यातील गौडवाडी गांवात. आता या गावांतून आपल्या गावी कसे पोहचायचे असा प्रश्न पडलेल्या त्या मुलीस या गांवातील ललिता सिताराम होवळ या महिलेने माणूसकीतून तिच्या घरात आसरा दिला.ही बाब त्या मुलीने आपल्या कुटुबांला फोनवरुन सांगितली आणि लगेच आपल्याच तालुक्याचे आमदार हे राज्याचे गृहमंत्री आहेत आपल्याला त्यांचा आधार नक्कीच मिळेल म्हणून धाडसाने तिने थेट गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनाच फोन लावला आणि मी या गांवात कशी पोहचले याची हकीकत सांगून मला माझे घरी पोहचविण्याची व्यवस्था करा अशी विनंती केली.


गृहराज्यमंत्र्यांनीही तिचा फोन ठेवताच तातडीने सोलापुर जिल्हयाचे जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांना फोन लावला आणि चुकलेली मुलगी सोलापूर जिल्हयातील कोणत्या गांवात कोणाकडे राहिली आहे याची माहिती देत पाटण पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्याचे पत्र तिच्या कुटुंबातील व्यक्तीकडे देवून गाडी पाठवून देत आहे त्या मुलीस तातडीने तिच्या कुटुंबियांच्या ताब्यात दयावे असे सांगितले.पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनीही तात्काळ त्याठिकाणच्या पोलीस निरीक्षकाला त्या मुलीस शोधून काढण्याचे तसेच तिला तिचे कुटुंबातील व्यक्ती आल्यानंतर ताब्यात देण्याचे सुचना केल्याने मुलीच्या भावाने तात्काळ सोलापुरातील सांगोला तालुक्यातील गौडवाडी गाव गाठले आणि आपल्या बहिणीला ताब्यात घेत आसरा देणाऱ्या त्या महिलेचे आभार मानले.आणि आपली मुलगी सुखरुप आपल्या घरी पोहचविण्याकरीता तातडीने हालचाली गतीमान करणारे राज्याचे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंचे त्या संबधित मुंलीने आणि तिच्या कुटुंबिंयानी विशेष आभार मानले.