बनपेठवाडी (येराड),गुंजाळी येथे कोयना नदीकाठी घाट व पुरसंरक्षक भिंतीच्या कामांना  वित्तमंत्री शंभूराज देसाईंनी केले 06 कोटी  26 लाख 38 हजार रुपये मंजूर


बनपेठवाडी (येराड),गुंजाळी येथे कोयना नदीकाठी घाट व पुरसंरक्षक भिंतीच्या कामांना  वित्तमंत्री शंभूराज देसाईंनी केले 06 कोटी  26 लाख 38 हजार रुपये मंजूर


कराड : पाटण विधानसभा मतदारसंघातील कोयना नदीकाठी वसलेल्या गावांना कोयना नदीस अतिवृष्टीच्या काळात येणाऱ्या पुरामुळे धोका निर्माण होत असल्याने १० गावांना पुर संरक्षक भिंती बांधण्यास व कोयना नदीवर घाट बांधणेस राज्य शासनाच्या जलसंपदा विभागाने निधी उपलब्ध करुन द्यावा, अशी राज्याचे अर्थमंत्री ना.शंभूराज देसाईंची सन २०१४ ते २०१९ या पंचवार्षिकमध्ये आमदार असताना सातत्याची शासनाकडे मागणी होती.गत पंचवार्षिकमध्ये आमदार असताना त्यांनी ०७ गावांना कोयना नदीकाठी पुरसंरक्षक भिंती व घाट बांधणेकरीता भरघोस असा निधी मंजुर करुन आणला होता यातील तीन गांवाना निधी मिळणे बाकी होते त्यातील बनपेठवाडी (येराड), गुंजाळी या दोन गावांना कोयना नदीकाठी पुरसंरक्षक भिंती व घाट बांधणेकरीता अर्थमंत्री ना.शंभूराज देसाईंनी 06 कोटी 26 लाख 38 हजार रुपयांचा निधी मंजूर केला असून या कामांना प्रशासकीय मान्यता दिल्याचा शासन निर्णय शासनाच्या जलसंपदा विभागाने दि. 06 मार्च 2020 रोजी पारित केला आहे.


पाटण मतदारसंघातील कोयना नदीकाठी वसलेल्या गावांना पावसाळयामध्ये कोयना धरणातून वारंवार सोडण्यांत येणाऱ्या पाण्यामुळे कोयना नदीस पुर आल्यानंतर नदीकाठच्या गावांना धोका निर्माण होत असल्याने मतदारसंघातील कोयना नदीकाठच्या अशा 10 गावांना कोयना नदीवर घाट व संरक्षक भिंत बांधणेच्या कामांस राज्य शासनाने जलसंपदा विभागाच्या महाराष्ट्र कृष्णा खोरे पाटबंधारे विकास महामंडळ, पुणे अंतर्गत आवश्यक असणारा निधी उपलब्ध करुन द्यावा अशी त्यांची सन 2004 पासून राज्य शासनाकडे मागणी होती. यासंदर्भात त्यांनी दि. 03.08.2016 रोजी लक्षवेधी सुचनाही विधानसभा सभागृहात मांडली होती त्यावेळी तात्काळ या कामांना प्रशासकीय मान्यता देऊन निधी उपलब्ध करुन दिला जाईल असे आश्वासन लक्षवेधी सुचनेला दिले होते.त्यानुसार मतदारसंघातील कोयना नदीकाठी वसलेल्या व पुराचा धोका निर्माण होणाऱ्या मंद्रुळहवेली,नेरळे,गिरेवाडी,पश्चिम सुपने,केसे,साजूर व तांबवे या ०७ गावांना कोयना नदीवर घाट व पुरसंरक्षक भिंती बांधण्यास आवश्यक असणारा निधी त्यांनी गत पंचवार्षिकमध्येच मंजुर करुन आणला होता आज या कामांना प्रत्यक्षात सुरुवात देखील झाली असून यातील अनेक कामे प्रगतीपथावर असून लवकरच पुर्ण होण्याच्या मार्गावर आहेत.


उर्वरीत राहिलेल्या सांगवड,बनपेठवाडी(येराड) व  गुंजाळी या दोन गांवातील  कोयना नदीकाठी पुरसंरक्षक भिंती व घाट बांधणेकरीता ना.शंभूराज देसाईंनी अर्थमंत्री झालेनंतर जलसंपदा विभागाकडून सविस्तर प्रस्ताव मागवून घेतला व या तीन गावापैकी बनपेठवाडी(येराड) व  गुंजाळी या दोन गांवाना अनुक्रमे ०२ कोटी ६९ लाख  ८१ हजार व ०३ कोटी ५६ लाख ५७ हजार असा एकूण 06 कोटी 26 लाख 38 हजार रुपयांचा निधी मंजूर केला आहे.याचा शासन निर्णयही दि.०६ मार्च रोजी जलंसपदा विभागाने पारित केला आहे.सांगवड या गावाला नदीकाठी पुरसंरक्षक भिंती व घाट बांधणेकरीताचे अंदाजपत्रक सुमारे ०५ कोटी रुपयांच्या वर गेल्यामुळे या कामांस विशेष मान्यता घेवून निधी मंजुर करण्यात येणार असल्याने १० पैकी केवळ ०१ गांवास नदीकाठी पुरसंरक्षक भिंती व घाट बांधणेकरीताचा निधी मंजुर करणे प्रलंबीत असून लवकरच सांगवड या गावाच्या कोयना नदीकाठी पुरसंरक्षक भिंती व घाट बांधणेकरीताचा निधी मंजुर करण्यात येईल असेही अर्थराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी म्हंटले आहे.