पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन


सातारा -   महिला व बाल कल्याण क्षेत्रात उत्कृष्ठ काम करीत असलेल्या समाज सेविका व संस्था यांना सन 2018-19 व 2019-20 या दोन वर्षाचे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार देण्यात येणार आहे. तरी इच्छुकांनी 31 मार्च पर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी रोहिणी ढवळे यांनी केले आहे.


10 वर्षापेक्षा अधिक महिला व बाल कल्याण क्षेत्रात उत्कृष्ठ कार्य करणाऱ्या समाजसेविका व स्वयंसेवी संस्थांनी पुस्तकी स्वरुपात प्रस्ताव चार प्रतीमध्ये  जिल्हा महिला व बाल कल्याण कार्यालयामध्ये 31 मार्चपर्यंत सादर करावीत. अधिक माहितीसाठी कार्यालयाच्या 02162-237353 या दूरध्वनी क्रमांकावर किंवा प्रत्यक्ष कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहनही जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी श्रीमती ढवळे यांनी केले आहे.