कराड तालुक्यातील 114 ग्राहकांचा वीज पुरवठा बंद


कराड तालुक्यातील 114 ग्राहकांचा वीज पुरवठा बंद


कराड - महावितरणकडून सद्यस्थितीत घरगुती, वाणिज्य व औद्योगिक वर्गवारीतील थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याची मोहिम वेगात सुरु आहे. यामध्ये प्रामुख्याने मोठय़ा रकमेचे थकबाकीदार असणाऱया वाणिज्यि व औद्योगिक थकबाकीदारांविरुद्ध कारवाई अधिक तीव्र करण्यात आली आहे. 


सातारा जिह्यातील कराड विभागात थकबाकीदार वाणिज्य व औद्योगिक 1975 ग्राहकांनी 73 लाख 94 हजार रुपयांचा भरणा केला. तर 6 लाख 98 हजार रुपयांच्या थकबाकीमुळे 114 ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. फलटण विभागात थकबाकी असलेल्या 359, सातारा विभागात 275, तर वाई व वडूज या दोन विभागात थकबाकी असलेल्या 381 ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला. सातारा जिह्यातील मंडल अंतर्गत वाणिज्यि व औद्योगिक वर्गवारीतील थकबाकीदार 1 हजार 129 ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला असून या वर्गवारीतील 7 हजार 64 थकबाकीदारांनी 2 कोटी 90 लाख रुपयांच्या वीजबिलांचा भरणा केला आहे.


तात्पुरता किंवा कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित केल्यानंतरही थकबाकीदार अनधिकृतपणे विजेचा वापर करीत असेल तर त्यांच्याविरुद्ध थेट फौजदारी कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच घरगुती, वाणिज्य व औद्योगिक ग्राहकांकडे किती रक्कम थकलेली आहे हे न पाहता नियमांच्या अधीन राहून या सर्वच थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्यात येत आहे.