आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रयत्नातून कराड दक्षिणसाठी 12 कोटी 51 लाख रुपये इतका भरीव निधी....मतदारसंघात दिलेल्या आश्वासनांची केली पूर्तता


आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रयत्नातून कराड दक्षिणसाठी 12 कोटी 51 लाख रुपये इतका भरीव निधी....मतदारसंघात दिलेल्या आश्वासनांची केली पूर्तता


कराड -  सन 2019-2020 या आर्थिक वर्षासाठी आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी सुचविलेल्या ग्रामीण भागातील गावांतर्गत मूलभूत सुविधा पुरविणे या योजनेतून कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील विविध विकासकामांसाठी तब्बल 12 कोटी 51 लाख रुपये इतका भरीव निधी मंजूर झाला आहे. 


राज्य शासनाच्या ग्रामविकास व पंचायत राज विभागाने पारित केलेल्या निर्णयानुसार हा निधी मंजूर करण्यात आला आहे. आ. चव्हाण यांनी राज्याचे ग्रामविकासमंत्री ना. हसन मुश्रीफ यांच्याकडे 8 फेब्रुवारी 2020 च्या पत्राद्वारे सदरच्या कामांसाठी निधी उपलब्ध करून देण्याबाबत मागणी केली होती. 


आ. चव्हाण यांनी सतत मतदारसंघात चौफेर विकास करण्यावर भर दिला आहे. मुख्यमंत्री असताना आ. चव्हाण यांना कराड दक्षिणसाठी भरघोस निधी देण्याची संधी मिळाली. त्यातून कराड व मतदारसंघाचा चेहरामोहरा बदलण्यात त्यांना यश आले. त्यानंतर आजदेखील ते मतदारसंघाच्या विकासासाठी अहोरात्र कार्यरत आहेत. त्यामुळे त्यांची समाजमनामध्ये "विकासाचा आश्वासक चेहरा" अशी प्रतिमा बनली आहे. त्यांनी मागणी केल्यानुसार नुकत्याच मंजूर झालेल्या निधीमध्ये कराड दक्षिणमधील डोंगरी विभाग, वांग खोरे, हायवेलगतचा भाग, कृष्णाकाठ यासह मलकापूर विभागात निधी देऊन समतोल साधला आहे. या निधीमधून 51 गावांमधील विकासकामांना मंजुरी मिळाली आहे. या विकासनिधींच्या माध्यमातून आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी मतदारसंघातील गावांना दिलेल्या आश्वासनांची पुर्तताच केली आहे. 


मंजूर झालेल्या निधीतून 51 गावातील अंतर्गत रस्ते काँक्रीटीकरण, आर. सी. सी गटार बांधणी, स्मशानभूमी सुधारणा व शेड बांधणी तसेच संरक्षक भिंत, नदीवरील घाट, बी. बी. एम कारपेट, रस्ते मुरुमीकरण व खडीकरण, रस्ते खडीकरण व डांबरीकरण, ग्रामपंचायत कार्यालय व ग्रामसचिवालय उभारणी, सामाजिक सभागृह बांधणी, पिकअप शेड बांधणे, ओढ्यावरील साकव पूल बांधणी, पाण्याची टाकी व वितरण व्यवस्था अशा कामांसाठी निधी मंजूर झाला आहे.


Popular posts
१५ एप्रिल नंतर मोफत तांदुळ होणार उपलब्ध
साताऱ्यातील 5 अनुमानितांचे रिपोर्ट निगेटिव्ह; 4 अनुमानित विलगीकरण कक्षात दाखल; यापैकी नऊ महिन्याच्या बाळाचा श्वसन संस्थेच्या तीव्र जंतू संसर्गाने मृत्यू
Image
राज्य शासनामार्फत पत्रकारांसाठी गृह योजना राबवून घरे उपलब्ध करून द्यावीत : जेष्ठ पत्रकार आप्पासाहेब पाटील
Image
डॉ. अतुल भोसले यांचा विरोधकांना सवाल...इतरांच्या नावावर बोगस कर्ज का घेतले ? त्यांना तुरूंगात का जावे लागले ? या प्रश्‍नांची उत्तरे हिंमत असेल तर द्यावीत 
Image
शिवाजी विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना संचालकपदी प्रा.अभय जायभाये रुजू
Image