12 हजार विद्यार्थ्यांनी वाहिली यशवंतराव चव्हाण यांना शब्दसुरांची आदरांजली


12 हजार विद्यार्थ्यांनी वाहिली यशवंतराव चव्हाण यांना शब्दसुरांची आदरांजली


कराड - कराडचे सुपुत्र स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांची 107 वी जयंती विविध कार्यक्रमांनी साजरी करण्यात आली. आदरणीय पी.डी.पाटील गौरव प्रतिष्ठानच्यावतीने शहरातील सुमारे 12 हजार विद्यार्थी-विद्यार्थिनी व संगीत शिक्षक, संगीतप्रेमींची यशवंतराव चव्हाणसाहेब यांच्या जयंतीदिनी शब्दसुरांची आदरांजली वाहिली. शहरातील हजारो विद्यार्थ्यांसह राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी स्वर्गीय चव्हाणसाहेब यांच्या समाधिस्थळी अभिवादन केले. 


हजारो विद्यार्थ्यांनी एका सुरात गायलेल्या गीताने प्रीतिसंगम परिसर भारावून गेला. यावेळी खासदार श्रीनिवास पाटील, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले, उपाध्यक्ष प्रदीप विधाते, शिक्षण सभापती मानसिंग जगदाळे, सभापती प्रणव ताटे, व मान्यवरांनी समाधीस्थळी आदरांजली अर्पण केली. विठामाता विद्यालय, कै.रा.कि.लाहोटी कन्या प्रशाला, श्री शिवाजी विद्यालय, टिळक हायस्कूल, दि.का.पालकर माध्यमिक विद्यालय, महाराष्ट्र हायस्कूल, श्री संत तुकाराम हायस्कूल, सरस्वती विद्यामंदिर, यशवंत हायस्कूल, एच्.के.डी.अँग्लो ऊर्दू हायस्कूल, शाहीन हायस्कूल, वेणूतार्इ इंग्लिश मिडीयम स्कूल व एस्.एम्. एस्.इंग्लिश स्कूल आदि शाळेतील् सुमारे 12 हजार विद्यार्थिनींनी उधळीत शत किरणा, उजळीत जन हृदया हे देशभक्तिपर गीत, इतनी शक्ति हमे दे ना दाता ही प्रार्थना व राष्ट्रगित सादर करून, ’शब्दसुरांची आदरांजली’ वाहीली.


आसावरी महाजन यांनी रचलेले व लयबध्द केलेले यशवंत गौरव गीत विनया दिक्षीत, स्वाती भागवंत, विणा घळसासी, अनघा घळसासी, योगिता जोशी, स्नेहल मुळीक, सिमंतीनी तांबवेकर, शुभांगी कल्याणकर,  वसंत  जोशी, श्रीधर घळसासी, महेंद्र जोशी, मकरंद किर्लोस्कर यांनी सादर केले त्यांना संवादिनीची साथ केली. शुभदा पटवर्धन, संगिता भोर्इ-मुळे, तबला साथ ज्ञानेश्वर कल्याणकर व अभिजीत भोपते यांनी केली. सुत्रसंचालन प्रा.एस.ए.डांगे सर  यांनी केले. स्वागत डॉ.अशोकराव गुजर यांनी केले. खासदार श्रीनिवास पाटील यांनी शुभेच्छा दिल्या. जिल्हा परिषद अध्यक्ष उदय कबुले यांनी मनोगत व्यक्त केले. आभार दिलीपभाऊ चव्हाण यांनी मानले.


जि.प.उपाध्यक्ष प्रदिप विधाते, शिक्षण व अर्थ सभापती मानसिंगराव जगदाळे, सह्याद्रि सहकारी साखर कारखान्याचे संचालक जशराजबाबा पाटील, कृषि सभापती मंगेश धुमाळ, महिला कल्याण सभापती सोनाली पोळ, समाजकल्याण सभापती कल्पना खाडे, पंचायत समिती सभापती प्रणव ताटे, उपसभपती रमेश देशमुख,  जि.प.सदस्य भिमरावकाका पाटील, निवास थोरात, सागर शिवदास, सुवर्णा देसार्इ, जि.प.चे उपमुख्याधिकारी अविनाश फडतरे  गट शिक्षणाधिकारी शबनम मुजावर, प्रशासन अधिकारी जमिला मुलाणी, श्री शिवाजी शिक्षण संस्थेच जनरल सेक्रेटरी प्रकाशबापू पाटील, माणिक पाटील, भास्कर कुलकर्णी, राष्ट्रवादी कराड तालुका महिला अध्यक्षा प्रभावती माळी, राजेंद्र वसंतराव माने, रेश्मा कोरे, शोभा पाटील, प्रा.रामभाऊ कणसे, अबुबकर सुतार, नरेंद्र पवार,  संभाजी पाटील, अंकूश पाटील, जिल्हा परिषद व पंचायत समितीचे आजी-माजी सदस्य, आजी-माजी नगरसेवक, विविध संस्थांचे पदाधिकारी, उपजिल्हा रूग्णालयाचे डॉक्टर्स, कराड व परिसरातील यशवंतप्रेमी व मुख्याध्यापक, शिक्षकवर्ग व विद्यार्थी-विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होते.


जिल्हा परिषद अध्यक्ष उदय कबुले यांनी शुभेच्छा व्यक्त करून, 5 वी व 8 वीच्या विद्यार्थ्यांंना शिष्यवृत्तीच्या पूर्व तयारीसाठी, 4 थी व 7 वीच्या विद्यार्थ्यांना ’यशवंतराव चव्हाण शिष्यवृत्ती’ जाहिर केली.