जिल्हाधिकारी यांच्याकडून कलम 144 लागू 


जिल्हाधिकारी यांच्याकडून कलम 144 लागू 


सातारा - सातारा जिल्ह्यात 22 मार्च पासून 31 मार्च पर्यंत कलम 144 लागू केले असून त्याचे पालन करणार नाही त्याच्यावर कारवाई करण्यात येईल. यातून अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्या असून बाकींच्यांना हे आदेश लागू होतील. जनतेने सहकार्य करावे असे आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले आहे.


 संसर्ग बाधित रुग्ण आढळत आहे . यामुळे संसर्ग वाढण्याची  शक्यता लक्षात घेऊन कोरोनाग्रस्त इतर लोकांच्या संपर्कात येऊ नये तसेच सार्वजनिक किंवा खाजगी ठिकाणी एकत्र येणे थांबणे, चर्चा करणे कार्यक्रमाचे आयोजन करणे इत्यादी बाबींमुळे या विषाणूचा संसर्ग व प्रादुर्भाव पसरण्याची शक्यता लक्षात घेऊन सर्वसामान्य जनतेच्या आरोग्यास धोका होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 


 या पार्श्वभूमीवर कोरोना  विषाणूंचा फैलाव होऊन सार्वजनिक आरोग्य धोक्यात येवू नये यासाठी सातारा जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी संपूर्ण सातारा जिल्ह्यात प्रतिबंध घालण्यासाठी दि. 22 मार्च रोजीच्या रात्री 9 वाजल्या पासून ते 31 मार्च रात्री 12 वाजेपर्यंत क्रिमीनल प्रोसिजर कोड 1973 चे कलम 144 लागू केले आहे. यानुसार सातारा‍ जिल्ह्यात कोणत्याही ठिकाणी एका वेळेस पाच किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्तींना जमा होण्यास मनाई करण्यात आली आहे.


 


 


Popular posts
कोरोनाला प्रतिबंध करायचे, मृत्यूला परत पाठवायचे तर एकांतवासात राहायचे
Image
श्रीमंत छ. उदयनराजे भोसले यांचेकडून १६ हजार ५०० वह्यांचे वाटप......शाळा नंबर ३ चा कायापालट होणार : राजेंद्रसिंह यादव
Image
पुणे कारागृहातुन आलेले 2 जणांसह 5 बाधित..आत्तापर्यंत जिल्ह्यात एकूण 74 बाधित रुग्णांची संख्या
श्री गजानन सेवा ट्रस्ट यांचेकडून मुख्यमंत्री सहयत्ता निधीसाठी रुपये २५ हजार रुपयांचा धनादेश
Image
अन्यथा महामार्गाचे काम बंद पाडणार....मलकापूर हद्दीतून येणारे पावसाचे पाणी कोयना नदीत सोडावेरा.....जेंद्रसिंह यादव यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
Image